Home /News /maharashtra /

6 वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी तिघांनी टाकल्या उड्या, तो वाचला पण तिघे गेले वाहून!

6 वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी तिघांनी टाकल्या उड्या, तो वाचला पण तिघे गेले वाहून!

सहा वर्षांचा लहान मुलगा वाहून जात आहे हे पाहून, त्याला वाचवण्यासाठी दोन तरुणांनी उडी घेतली.

सहा वर्षांचा लहान मुलगा वाहून जात आहे हे पाहून, त्याला वाचवण्यासाठी दोन तरुणांनी उडी घेतली.

सहा वर्षांचा लहान मुलगा वाहून जात आहे हे पाहून, त्याला वाचवण्यासाठी दोन तरुणांनी उडी घेतली.

बीड, 06 सप्टेंबर : नदी पात्रातील (river) बंधाऱ्यात बुडणाऱ्या सहा वर्षांच्या मुलास वाचवणारेच बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना बीड (beed) जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात घडली आहे. या दुर्दैवी घटनेत बापलेकासह भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे आज दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत बुडणारा मुलगा वाचला असून तिघे जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याच्या लाटेने हा बालक बाहेर फेकला गेल्याने तो वाचला. परंतु, हा तरूण बुडत होता. एवढ्यात काठावर उभा असलेल्या बुडणाऱ्यांपैकी एका मुलाच्या वडिलांनी पाण्यात उडी घेतली. यात दुर्दैवाने तिघेही बुडाले. पेढे वाटताना लाज नाही वाटत का? बेळगाव निकालावर संजय राऊत भडकले रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता. सहा वर्षांचा लहान मुलगा वाहून जात आहे हे पाहून, त्याला वाचवण्यासाठी दोन तरुणांनी उडी घेतली. त्यानंतर मधुकर रोहिदास खळगे यांनी देखील पाण्यात उडी घेतली. त्यांचा मुलगा अजय मधुकर खळगे (वय -22), भैय्यासाहेब उजगरे याने देखील त्यांना वाचविण्यासाठी पुरात उडी घेतली. परंतु, दुदैवाने यात तिघांचाही मृत्यू झाला. यावेळी  4 तासाच्या शोधनंतर तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर; ICU मध्ये दाखल, अभिनेता मुंबईत दाखल दरम्यान, घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज पोळा सण असल्यामुळे गावातील तिघांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी पोळा सण साजरा न करण्याचं जाहीर केलंय. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Beed news, बीड

पुढील बातम्या