Home /News /maharashtra /

चिमुकल्याला वाचवायला गेले अन् बापलेकासह तिघांनी हरली जिवाची बाजी; बीडमधील हृदय पिळवटणारी घटना

चिमुकल्याला वाचवायला गेले अन् बापलेकासह तिघांनी हरली जिवाची बाजी; बीडमधील हृदय पिळवटणारी घटना

नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवताना तिघांनी आपला प्राण गमावला आहे.

नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवताना तिघांनी आपला प्राण गमावला आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवताना तिघांनी आपला प्राण गमावला (3 men drown in flood water) आहे.

    बीड, 07 सप्टेंबर: बीड (Beed) जिल्ह्यातील वडवणी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवताना तिघांनी आपला प्राण गमावला (3 men drown in flood water) आहे. मृत तिघांमध्ये बापलेकासह गावातील अन्य एका तरुणाचा समावेश आहे. एकाच दिवशी गावातील तीन जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं गावात शोककळा पसरली आहे. दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्यानं संबंधित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मधुकर खळगे (वय-55), अजय मधुकर खळगे (वय- 25) आणि भैय्या उजगीरे (वय-22) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. संबंधित तिघेही बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी आहे. मागील दोन दिवसांपासून वडवणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे वडवणी तालुक्यातील मामला तलाव ओसंडून वाहत आहे. त्यामुळे वडवणी येथील नदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. हेही वाचा-विरार हादरलं! मंदिरात जाताना घडला घात; भल्या पहाटे बड्या बिल्डरचा खेळ खल्लास दरम्यान काल सोमवारी अजय काळे नावाचा एक लहान मुलगा पुराचं पाणी पाहात उभा होता. दरम्यान अचानक तोल गेल्यानं तो पाण्यात पडला. चिमकल्याला पाण्यात बुडताना अजय खळगे आणि भैया उजगीरे या दोन तरुणांनी पाहिलं. दोघांनी कसलाही  विचार न करता चिमुकल्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी मारली. या दोन तरुणांच्या पाठोपाठ अजय खळगे याचे वडील मधुकर खळगेही चिमुकल्याला वाचवायला पुढे सरसावले. हेही वाचा-...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; तलाठ्याकडून डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून पण या दुर्दैवी घटनेत बापलेकासह तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नदीपात्रातील बंधाऱ्याच्या पाण्यात बुडालेला चिमुकला काही वेळातच लाटेसोबत पाण्याबाहेर फेकला गेला. या दुर्दैवी घटनेत पूराच्या पाण्यात बुडणारा चिमुकला बचावला आहे. पण ऐन बैलपोळा सणाच्या दिवशी गावातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news

    पुढील बातम्या