• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नर्स जोमात, ठाणे पालिका कोमात, अवघ्या 10 मिनिटात महिलेला दिले लशीचे 3 डोस!

नर्स जोमात, ठाणे पालिका कोमात, अवघ्या 10 मिनिटात महिलेला दिले लशीचे 3 डोस!

ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदरील आनंदर लसीकरण सेंटरवर हा प्रकार घडला आहे.

  • Share this:
ठाणे, 28 जून : कोरोनावर (corona) मात करण्यासाठी लसीकरणावर (corona vaccination ) भर दिला जात आहे. दोन लशीचे डोस घेण्यासाठी ठराविक दिवसांचे अंतर ठरवून दिला आहे. पण, ठाण्यात एका परिचारिकेनं 10 मिनिटांच्या अंतराने एका महिलेला 3 लशीचे डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात (thane) घडला आहे. लस मिळवण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. लशीचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण अजूनही वंचित आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या (thane municipal corporation) एका लसीकरण सेंटरमध्ये एका महिलेला चक्क 3 लशीचे डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदरील आनंदर लसीकरण सेंटरवर हा प्रकार घडला आहे. Post Office च्या या योजनेत गुंतवणूक फायद्याची; काही महिन्यांतच दुप्पट होईल रक्कम आश्चर्य म्हणजे, या महिलेला 10 मिनिटांत लशीचे हे तीन डोस दिले गेले आहेत. याबद्दल तिने परिचारिकेला विचारणा केली, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. कोविड सेंटरवरून बाहेर पडल्यानंतर या महिलेनं या विषयी स्थानिक नगरसेविकेशी संपर्क साधला आणि संपूर्ण हकिकत सांगितली. त्यानंतर या नगरसेविकेने महानगरपालिकेच्या डॉक्टरांना याबाबत जाब विचारला मात्र तरी देखील याबाबत ठाणे महापालिकेने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी या घटनेची माहिती समोर आली. ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी या विषयी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांना जाब विचारला. तसंच प्रसार माध्यमांनीही आयुक्त विपीन शर्मा यांना विचारले असता, 'मी यावर काहीच बोलू शकत नाही' असं म्हणत आयुक्तांनी प्रसार माध्यमांशी बोलणं टाळणं आणि निघून गेले. टीम इंडिया श्रीलंकेला रवाना, नवे शिलेदार इतिहास घडवण्यासाठी सज्ज, पाहा PHOTOS दरम्यान, एकापाठोपाठ तीन लस दिल्यामुळे या महिलेला डॉक्टरांच्या नजरेखाली ठेवण्यात आलं होतं. पण, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दररोज 15 लाख लसीकरणाची शासनाची तयारी दरम्यान, तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
Published by:sachin Salve
First published: