Home /News /maharashtra /

पंढरपूरमध्ये कोरोनाग्रस्त देशातून आले 3 डॉक्टर, 14 दिवस व्यवसाय करण्यास बंदी

पंढरपूरमध्ये कोरोनाग्रस्त देशातून आले 3 डॉक्टर, 14 दिवस व्यवसाय करण्यास बंदी

या तिन्ही डॉक्टरांना पुढील 14 दिवस वैद्यकीय व्यवसाय करू नका, असा अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

 पंढरपूर, 16 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसमुळे एकच हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या नावाने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशाच एका   कोरोना बाधित प्रदेशात 14 दिवसांचा प्रवास करून 3 डॉक्टर पंढरपुरात दाखल झाले आहेत. या तिन्ही डॉक्टरांना पुढील 14 दिवस वैद्यकीय व्यवसाय करू नका, असा अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. शहरातील 3 डॉक्टर काही कारणानिमित्त रशियाला गेले होते. ते देशात परत आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोना बाधित  प्रदेशात मागील काही दिवसांच्या काळात त्यांनी प्रवास केल्याची नोंद आहे. त्यांना कोरोना बाधा झाल्याची लक्षणं नसली तरीही त्यांनी तपासणी दिनांकापासून पुढे 14 दिवसांपर्यंत कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय व्यवसाय करणे तसंच आपणास सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्यूमोनिया काही वेळा मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणं असल्यास आपण तात्काळ जवळील शासकीय रुग्णालयाशी किंवा राज्य नियंत्रण कक्ष एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षाला कळवावं, अशी सूचना करण्यात आली आहे. तसंच, 14 दिवस स्वतःच्या घरात वेगळं राहणे आवश्यक राहील. स्वतःच्या घरात एका वेगळ्या खोलीत राहताना त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी होम क्वारंटाइनबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि त्यांच्यावर बंधनकारक असेल. केंद्र शासनाच्या होम क्वारंटाइन संबंधीच्या सूचनांचे स्वत:च्या घरात पालन न करणाऱ्यांना राज्य शासनाने कार्यान्वित केलेल्या कक्षात भरती करण्यात येईल, अशा सूचना आरोग्य विभागाकडून त्या 3 डॉक्टरांना दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39वर दरम्यान, राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39वर गेली आहे. मुंबईतला कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखीन 5 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आहे. मुंबई आणि नवी मुंबईत नवीन ही नवीन रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: China, Japan

पुढील बातम्या