Home /News /maharashtra /

सांगोल्यात भीषण अपघात; घटनेत तिघांचा जागीच मृत्यू तर 9 जखमी

सांगोल्यात भीषण अपघात; घटनेत तिघांचा जागीच मृत्यू तर 9 जखमी

ही घटना सोलापूरच्या सांगोला मिरज रस्त्यावर घडली आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की घटनेत चारचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.

सोलापूर 03 ऑगस्ट : सोलापूरमध्ये चारचाकी आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात (Road Accident in Solapur) झाला आहे. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू (3 Died in an Road Accident at Sangola) झाला आहे, तर 9 जण जखमी झाले आहेत. ही घटना सोलापूरच्या सांगोला मिरज रस्त्यावर घडली आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की घटनेत चारचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. तर, तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुणे हादरलं! पैसे परत घ्यायला गेला अन् परतलाच नाही; स्मशानभूमीतच तरुणाचा शेवट घटनेत चारचाकी चालकासह दोन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. तर, चारचाकी गाडीतीलच 9 जण जखमी झाले आहे. यात चालकासह दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कावेरी मनोज हरिजन (वय 7) आणि गुड्डी चंद्रकांत मगिरी ( वय 8) अशी घटनेत मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Road accident, Solapur

पुढील बातम्या