मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मालेगावजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची कारला धडक, 3 जण ठार

मालेगावजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची कारला धडक, 3 जण ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळल्याने या भीषण अपघातात

मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळल्याने या भीषण अपघातात

मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळल्याने या भीषण अपघातात...

मालेगाव, 20 डिसेंबर : मालेगाव (malegaon)-मुंबई-आग्रा महामार्गावर ( Mumbai-Agra highway) ट्रक आणि कारचा भीषण अपघात घडला आहे. मालेगावच्या मुंगसे भागात मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळल्याने या भीषण अपघातात कारमधील  3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहे त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. तालुका पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावजवळ मुंगसे बाजार समिती समोर हा भीषण अपघात घडला आहे.  MH-41,BE-3707 ही कार मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावच्या मुंगसे भागात रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यात मागे 3 तर पुढे 2 जण बसलेले होते. याच मार्गावरून MH-04, JU-9166 हा ट्रक भरधाव वेगाने धुळ्याकडे जात असताना तो उभ्या असलेल्या कार वर जाऊन जोरात आदळला. अपघात इतका भीषण होता की, मागे बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पुढे असलेले दोघे गंभीर जखमी झाले.अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सामान्य रुग्णलायत दाखल केले.अपघातात मृत्यू झालेल्या पैकी दोघांची ओळख पटली आहे त्यात एक धुळ्याचा तर दुसरा नाशिकचा आहे. एका ओळख पटलेली नाही. जखमी बेशुद्धावस्थेत असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

काहीच न करता ही तरुणी कमावते बक्कळ पैसा; कमाईचा मार्ग पाहून तर थक्कच व्हाल

मालेगावचा मुंगसे परिसर हा मुंबई-आग्रा महामार्गाला खेटून आहे. सध्या एसटी बंद असल्यामुळे प्रवासी धुळे,नाशिककडे जाणारे प्रवासी मुंगसे भागात हायवेवर येऊन थांबतात आणि मिळेल त्या वाहनाने जातात. आजची घटना त्यातूनच घडल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी नेहमीच अपघात होतात या अगोदर देखील अपघातात होऊन त्यात काहींचा बळी गेला तर अनेक जण जखमी झाले आहे.

भरधाव कारने दोन बहिणींना चिरडले

दरम्यान, भरधाव स्कार्पिओ कारने दोन सख्या बहिणींना चिरडल्याची घटना बीडमध्ये घडली आहे.  जेवण करून घराबाहेर उभे असलेल्या दोन सख्या बहिणींना भरधाव स्कार्पिओने चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर पाटोदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जामखेड-पाटोदा रस्त्यावर धनगर जवळका गावात हा थरार घडला. रोहिणी गाडेकर आणि मोहिनी महारुद्र गाडेकर असं मृत बहिणींचे नावं आहेत. स्कार्पिओ कारने आणखी दोघांना चिरडले असून ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  घटनेनंतर स्कार्पिओ  चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published: