Home /News /maharashtra /

मोठी बातमी, अमरावतीत 2 स्कॉर्पिओ गाड्यातून 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती नागरिक ताब्यात!

मोठी बातमी, अमरावतीत 2 स्कॉर्पिओ गाड्यातून 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती नागरिक ताब्यात!

कुणाला संशय येऊ नये म्हणून गाडीतील सीटच्या खाली जागा करण्यात आली होती. यात 3 कोटी 50 लाखांची रोकड लपवून ठेवण्यात आली होती.

अमरावती, 27 जुलै  : अमरावती (amravati) शहरात दोन स्कॉर्पिओ (Scorpio vehicles) गाड्यांमधून तब्बल 3 कोटी 50 लाखांची रोकड (3 crore 50 lakh cash seized) जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ही रक्कम हवालामार्फत नेण्यात येत होती, अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातून हवालामार्फत मोठ्या रक्कमेची वाहतूक होत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी दोन स्कॉर्पिओ गाड्या अडवण्यात आल्यात. या दोन्ही गाड्यांमधून सुमारे तीन कोटी 50 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. ..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू हवालामार्फत शहरातून मोठ्या रक्कमेची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील फरशी स्टॉप परिसरात नाकाबंदी केली होती. यावेळी दोन स्कॉर्पिओ गाड्यांना थांबवण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा या वाहनांची तपासणी केली तेव्हा 3 कोटी 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली.  स्कॉर्पिओमधून या मोठ्या रकमेची वाहतूक करणारे चार नागरिक हे गुजराती असून दोघे अमरावतीमधील आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओमध्ये पैसे ठेवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पूरग्रस्तांना उद्या मिळणार मोठा दिलासा, विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता कुणाला संशय येऊ नये म्हणून गाडीतील सीटच्या खाली जागा करण्यात आली होती. यात 3 कोटी 50 लाखांची रोकड लपवून ठेवण्यात आली होती. एवढी मोठी रक्कम जेव्हा आढळून आली तेव्हा उपस्थितीत कर्मचाऱ्यांचे डोळे विस्फारून गेले होते. नोटांची बंडल बाहेर काढण्यात आली. ही रक्कम मोजण्यासाठी दोन स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यासंदर्भात ट्रेझरी व इन्कम टॅक्स विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या