Home /News /maharashtra /

लातुरात तरुणाला जिवंत जाळलं; महिनाभरानं उलगडलं गूढ, भावजय ठरली मृत्यूचं कारण

लातुरात तरुणाला जिवंत जाळलं; महिनाभरानं उलगडलं गूढ, भावजय ठरली मृत्यूचं कारण

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Latur: आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी लातूर तालुक्यातील भोईसमुद्रा येथील एका शेतातील आखाड्यात एका तरुणाचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेचं गूढ उलगडलं आहे.

    लातूर, 19 जानेवारी: आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी लातूर (Latur) तालुक्यातील भोईसमुद्रा येथील एका शेतातील आखाड्यात एका तरुणाचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला (dead body found in burnt condition) होता. संबंधित तरुणासोबत नेमकं काय घडलं? हा अपघात आहे की घातपात? याबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. एक महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचं गूढ उलगडलं (Mystery revealed) आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोघांना बेड्या ठोकल्या (2 accused arrested) आहेत. संबंधित आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ऋषीकेश रामकिशन पवार असं हत्या झालेल्या 29 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो लातूर तालुक्यातील भोईसमुद्रा येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी 19 डिसेंबर रोजी रात्री तो आपले मेहुणे रणजीत विजयकुमार देशमुख आणि चुलत भाऊ गोविंद नागोराव पवार यांच्यासोबत शेतातील आखाड्यावर दारू पार्टी केली होती. दारुच्या नशेत असलेला चुलत भाऊ आणि मेहुण्याने मृत ऋषीकेशला 'तू आमच्या भावजयीशी फोनवर का बोलत असतो?' अशी विचारणा केली. हेही वाचा-भयंकर! बळी देताना बकऱ्याऐवजी छाटली बोकड पकडणाऱ्याची मान, तडफडून मृत्यू भावजयीला फोनवरून बोलण्यावरून तिघांचा आपसात वाद झाला. याच वादातून आरोपी चुलत भाऊ गोविंद पवार याने मृताच्या डोक्यात शेतीच्या अवजाराने वार केला. या हल्ल्यात ऋषीकेश बेशुद्ध झाला. या घटनेनंतर घाबरलेले आरोपी गोविंद पवार आणि रणजीत देशमुख यांनी ऋषीकेशचा मृतदेह खाटेवर झोपवला आणि पेट्रोल ओतून पेटवून दिला. 19 डिसेंबर रोजी संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पण मृतासोबत नेमकं काय घडलं याचं गूढ बनलं होतं. हेही वाचा-मंदिरात गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; नराधमाने जंगलात नेऊन दिल्या नरक यातना गेल्या एक महिन्यात पोलिसांनी गोपनीय माहिती, मोबाइल चॅटींग, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन, कॉल डिटेल्सच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध लावला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. भावजयीला फोन केल्यावरून दोघांनी ही हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Latur, Murder

    पुढील बातम्या