कॉलेजच्या पहिल्याच दिवशी 28 विद्यार्थ्यांना विवस्त्र करून घेतली 'ओळखपरेड'

15 ते 20 सीनिअर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या 28 विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 05:59 PM IST

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी 28 विद्यार्थ्यांना विवस्त्र करून घेतली 'ओळखपरेड'

जळगाव, 13 ऑक्टोबर: शहरातील इकरा युनानी महाविद्यालयात काही सीनिअर विद्यार्थ्यांनी 28 ज्युनिअर विद्यार्थ्यांना विवस्त्र करून त्यांची रॅगिंग घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे दोन वाजता महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ तीन विद्यार्थ्यांना निलंबित केलो आहे.

मिळालेली माहिती अशी की, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री 28 विद्यार्थ्यांना विवस्त्र करून वसतिगृहात डांबण्यात आले. त्यांनी रॅगिंग घेतण्यात आली. पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनसह केंद्र शासनाच्या दिल्ली येथील अॅन्टी रॅगिंग सेलकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. मुदस्सर मुख्तार इनामदार (वय 19, रा. परभणी) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. मुदस्सर याला शुक्रवारी (11 ऑक्टोबर) त्याच्या पालकांनी महाविद्यालयात सोडले होते. यानंतर शनिवारी त्यांच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. दिवसभर महाविद्यालयातील लेक्चर्स आटोपल्यानंतर रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले. यावेळी 15 ते 20 सीनिअर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या 28 विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला. त्यांना विवस्त्र करुन त्यांना त्रास देण्यास सुरूवात केली. सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्याप्रमाणे अॅक्टिंग करण्यास सांगून नंतर एकेक विद्यार्थ्यांची ओळखपरेड घेतली. यावेळी मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी अश्लील शिवीगाळ देखील केली. मुदस्सर याने या प्रकाराला विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला खाली वाकवून मारहाण केली. त्याच्या खिशातील मोबाइल काढून कचरापेटीत फेकला. तसेच, खिशातील 18 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्याची टास्क देण्यात आली. इतर विद्यार्थ्यांचा त्रास पाहून मुदस्सर याने स्वत:ची सुटका करुन घेत थेट हॉलमधून पळ काढला. त्याने सुरक्षारक्षकांची भेट घेऊन त्यांच्या मदतीने आपल्या पालकांना फोन करुन संबधित माहिती दिली. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख हे महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुदस्सरचे पालक महाविद्यालयात दाखल झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने पालकांसमोर घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबित केले.

दरम्यान, मुदस्सर याचा मोबाइल व रोख रक्कम 18 हजार रुपये काही जणांनी लांबवली आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

VIDEO : 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 05:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...