Home /News /maharashtra /

मालेगावात काँग्रेसला खिंडार, सोनिया गांधींच्या विश्वासू नेत्यासह 27 नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश

मालेगावात काँग्रेसला खिंडार, सोनिया गांधींच्या विश्वासू नेत्यासह 27 नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश

माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 नगरसेवक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली

माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 नगरसेवक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली

माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 नगरसेवक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली

मालेगाव, 25 जानेवारी : मालेगाव महापालिका निवडणुकीच्या (malegaon municipal corporation) तोंडावर काँग्रेसला मोठे  खिंडार पडले आहे. माजी आमदारासह तब्बल 27 नगरसेवक काँग्रेसला (congress) सोडचिठ्ठी दिली आहे. हे सर्व नगरसेवक 27 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये (ncp) प्रवेश करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हा मोठा धक्का आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला आहे. माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 नगरसेवक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या 27 जानेवारीला सर्वजण मुंबईतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती रशीद शेख यांनी दिली. (प्रत्येकाला Omicron ची लागण होईल का? WHO ने सांगितली मोठी गोष्ट) या अगोदर माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले असून आता त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख आई महापौर ताहेरा शेख सोबत 27 नगरसेवक देखील राष्ट्रवादी प्रवेश घेत आहे. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढंच नाहीतर रशीद शेख हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. 2006 साली मालेगावात बॉम्बस्फोट झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी मालेगावला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी त्यांचे कौतुकही केले होते. (रिक्षा चालवताना दिसला 'जीव माझा गुंतला'तील मल्हार; का ओढावली ही वेळ?) पण असे असतांनाही त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या