मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai : शाळेच्या लिफ्टने घेतला शिक्षिकेचा जीव; दोन महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या रुजू

Mumbai : शाळेच्या लिफ्टने घेतला शिक्षिकेचा जीव; दोन महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या रुजू

जिनल फर्नांडिस दोन महिन्यांपूर्वीच या शाळेत असिस्टेंट टीचर या पदावर रुजू झाल्या होत्या.

जिनल फर्नांडिस दोन महिन्यांपूर्वीच या शाळेत असिस्टेंट टीचर या पदावर रुजू झाल्या होत्या.

जिनल फर्नांडिस दोन महिन्यांपूर्वीच या शाळेत असिस्टेंट टीचर या पदावर रुजू झाल्या होत्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 सप्टेंबर : मागच्या आठवड्यात गुजरातच्या अहमदाबाद येथे निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबईतील मालाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या इमारतीतील लिफ्टमध्ये अडकून 26 वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. जिनल फर्नांडिस, असे मृत शिक्षिकेचं नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही घटना मालाड पश्चिममधील एसव्ही रोडवरील चिंचळी सिग्नलजवळ असलेल्या सेंट मेरी इंग्रजी शाळेत घडली आहे. ही शिक्षिका तासिका संपवून सहाव्या माळ्यावर असलेल्या स्टाफ रुममध्ये जात होती. यावेळी तिने सहाव्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्ट बोलावली. यानंतर ती लिफ्टमध्ये शिरलीदेखील होती. मात्र, अचानक लिफ्टचा दरवाजा बंद होण्याच्या आधीच लिफ्ट वरती जाऊ लागली. त्यामुळे या शिक्षिका लिफ्टमध्येच अडकल्या आणि त्या गंभीर जखमी झाल्या.

लिफ्टमध्ये अडकल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने धावपळ केली आणि त्यांना लिफ्टबाहेर काढले. यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी या शिक्षिकेला मृत घोषित केले. जिनल फर्नांडिस दोन महिन्यांपूर्वीच या शाळेत असिस्टेंट टीचर या पदावर रुजू झाल्या होत्या.

हेही वाचा - गुजरातमध्ये निर्माणाधीण इमारतीची सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली, भयानक घटनेत 7 मजुरांचा जागीच मृत्यू

या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी मालाड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. लिफ्टमध्ये बिघाड झाला होता का? या महिलेच्या मृत्यूला लिफ्ट मेन्टेनन्स कारणीभूत ठरला की निष्काळजीपणा, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. शाळेच्या इतर शिक्षकांचेही जबाब आता पोलिसांकडून नोंदवले जाणार आहेत. मात्र, या खळबळजनक घटनेनंतर लिफ्टमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

First published:

Tags: Death, Mumbai, School teacher, Woman