वर्ध्यातील उत्तम गलवा कंपनीत भीषण अपघात, 26 कामगार जखमी

वर्ध्यातील उत्तम गलवा कंपनीत भीषण अपघात, 26 कामगार जखमी

वर्ध्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

  • Share this:

वर्धा, 03 जानेवारी : वर्ध्या (Wardha) जिल्ह्यातील उत्तम गलवा कंपनीत (Uttam Galva Metallics Limited) भीषण अपघात घडला आहे. अंगावर कोळसा उडाल्यामुळे 26 कामगार जखमी झाले आहे. यात 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

वर्ध्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीमध्ये फरनेसचं काम चालू होतं. त्यावेळी अचानक एअर पास होऊन कोळसा अंगावर उडाला. कोळसा अंगावर उडाल्याने जवळपास 26 कामगार जखमी झाले आहे. या घटनेमुळे कंपनीत एकच गोंधळ उडाला होता.

जीन्स घालून शाळेत येणाऱ्या 5 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

त्यानंतर तातडीने काम थांबवण्यात आले आणि  26 कामगारांना सावंगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  या दुर्घटनेमध्ये 7 जण गंभीर जखमी झाले असून 30 टक्के भाजले आहे. जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे.

कंपनीत अचानक ही घटना घडली कशी, या प्रकाराबद्दल कंपनी व्यवस्थापनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: February 3, 2021, 12:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या