Home /News /maharashtra /

MSRTC ST Reservation: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खूशखबर! या तारखेपासून सुरू होणार एसटीचं बुकिंग

MSRTC ST Reservation: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खूशखबर! या तारखेपासून सुरू होणार एसटीचं बुकिंग

Extra St Buses for Konkan: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी जादा एसटी बसेस यंदाही धावणार आहेत. कुठून सुटणार बसेस आणि कधीपासून करू शकता रिझर्वेशन?

    मुंबई, 24 जून: गणेशोत्सव (Ganesh Festival) हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी हजारो चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातून कोकणात जात असतात. यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ (MSRTC) सज्ज झाले आहे. यंदाच्या गणेशोउत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2500 जादा गाड्या (ST Bus) सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबईतील विविध ठिकाणांहून या गाड़्या सुटणार असून गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ पाहणाऱ्या हजारो कोकणवासीयांना याचा फायदा होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2500जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 1300 बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून दिनांक 25 जून 2022 पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही एसटी महामंडळाकडून करण्यात आलं आहे. गणेशोत्सव आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी जादा एसटी बसेस धावत असतात. यंदा सुमारे २५०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. गणेशोत्सवासाठी 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील. तर 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईल ॲप, खाजगी बुकींग एजंट व त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे. हेही वाचा: एसटी महामंडळाचं विलीनीकरण झालंय का? अनिल परबांनी दिली सूचक प्रतिक्रिया गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणांवरून सुटणार गाड्या: आगार बसस्थानक वाहतूकीचे ठिकाणे मुंबई सेंट्रल: मुंबई सेंट्रल साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफपरेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी परळ: परळ सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल जोगेश्वरी कुर्ला नेहरूनगर: कुर्ला नेहरूनगर बर्वे नगर/सर्वोदय हॉ.(घाटकोपर), टागोरनगर विक्रोली, घाटला (चेंबूर), डि.एन नगर अंधेरी, गुंदवली अंधेरी, सांताक्रुझ (आनंदनगर), विलेपार्ले, खेरनगर बांद्रा, सायन हेही वाचा: Maharashtra Budget: अर्थसंकल्पात अजित पवारांनी एसटी महामंडळासाठी केली मोठी घोषणा पनवेल: पनवेल पनवेल आगार उरण उरण उरण आगार ठाणे 1 ठाणे 1 भाईंदर, लोकमान्य नगर, श्री नगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरिवली), मालाड, डहाणूकरवाडी/चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश मंदीर (गोरेगाव) ठाणे २: ठाणे २ भांडूप (प.) व (पू.), मुलुंड (पू.) विठ्ठलवाडी: विठ्ठलवाडी बदलापूर, अंबरनाथ कल्याण: कल्याण डोंबिवली (प.) व (पू.) नालासोपारा: नालासोपारा वसई: वसई आगार अर्नाळा: अर्नाळा आगार
    Published by:user_123
    First published:

    Tags: Ganesh chaturthi, Konkan, St bus

    पुढील बातम्या