Home /News /maharashtra /

भयंकर! अनैतिक संबंधाचा झाला रक्तरंजित शेवट, हिंगोलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या

भयंकर! अनैतिक संबंधाचा झाला रक्तरंजित शेवट, हिंगोलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Murder in Hingoli: औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी याठिकाणी एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे.

    हिंगोली, 24 जानेवारी: औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी याठिकाणी एका तरुणाची निर्घृण हत्या (young man brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारेकऱ्यांनी संबंधित तरुणाच्या डोक्यात दगड घालून तसेच काठीने मारहाण (crushed head with stone and beat with wooden stick) करत त्याचा जीव घेतला आहे. हत्येची ही घटना रविवारी सकाळी उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR lodged) दाखल केला आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे एका महिलेसह तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या (Murder in immoral relationship) झाल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. सचिन धुळबाजी धवसे असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत सचिन हा औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील रहिवासी आहे. 22 जानेवारी रोजी रात्रीपासून तो आपल्या घरातून गायब झाला होता. घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी डिग्रस कऱ्हाळे शिवारातील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. यावेळी सावळी येथील काही नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, हा मृतदेह सचिनचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. हेही वाचा-लातूर: भरदिवसा पाडला रक्ताचा सडा; महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याचे वार,पाहा VIDEO ही धक्कादायक घटना उघडकीस येताच नागरिकांनी औंढा नागनाथ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मारेकऱ्याच्या शोधासाठी श्वान पथकाला पाचारण केलं. श्वान पथकाने घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरापर्यंत मारेकऱ्यांचा माग काढला. पण मारेकरी काही सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि मृताच्या जवळच्या मित्रांची चौकशी केली. हेही वाचा-न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 10वर्षे रेप; तरुणीची कहाणी वाचून बसेल धक्का यावेळी पोलिसांना सचिनच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी फरार झालेल्या दोन आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी  मोबाइल लोकेशनच्या आधारे दोन्ही आरोपींना मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं. हे दोन्ही आरोपी पती पत्नी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास औंढा नागनाथ पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Murder

    पुढील बातम्या