बुलडाणा, 10 डिसेंबर: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यानं बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या (Student commits suicide) केली आहे. 24 वर्षीय मृत तरुण गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची (Competitive exam) तयारी करत होता. पण त्याला परीक्षेत आणि नोकरीत अपेक्षित यश मिळत नव्हतं. दुसरीकडे आई वडिलांनी आपल्यावर आणखी किती दिवस खर्च करायचा, याची चिंता त्याला सतावत होती. यातूनच नैराश्य आलेल्या तरुणाने आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.
योगेश समाधान माळेकर असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो चिखली तालुक्यातील अंत्री खेडकर गावातील रहिवासी होता. मृत योगेश स्पर्धा परीक्षेची तयारी करत, ठिकठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला काही नोकरी मिळत नव्हती. अशात घरी एकुलत्या एक बहिणीचं लग्न रखडलं होतं. त्यामुळे आई वडील आणखी किती दिवस आपला खर्च उचलतील. याची चिंता योगेशला लागली होती.
हेही वाचा-बड्या राजकीय नेत्याकडून तरुणीचं आयुष्य उद्धवस्त, लग्नानंतरही देत राहिला नरकयातना
या विवेचंनेतून नैराश्य आलेल्या योगेश याने आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. बराच वेळ योगेश घरी जेवणासाठी आला नाही, म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. आई-वडील आणि बहिणीनं त्याच्या सर्व मित्रांकडे चौकशी केली पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
हेही वाचा-दुचाकी घेऊन घराबाहेर पडला अन् परतलाच नाही; पत्नीसोबतच्या वादातून धक्कादायक पाऊल
यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी गावाजवळ असलेल्या आपल्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी जनावरांच्या गोठ्यात योगेशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. योगेशनं आत्महत्या केल्याचं निदर्शनास येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. एकुलत्या एक हुशार मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Suicide