धक्कादायक: पालघरमधील कासा उपजिल्हा रुग्णालयातून 24 संशयित रुग्ण पळाले

धक्कादायक: पालघरमधील कासा उपजिल्हा रुग्णालयातून 24 संशयित रुग्ण पळाले

विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या परिसराला पोलिसांचा वेढा असून पोलिसांची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नजर चुकवून हे संशयित रुग्ण पळाले आहेत.

  • Share this:

पालघर, 19 एप्रिल: कासा उपजिल्हा रुग्णालयातील संस्थात्मक अलगीकरण कक्षातून 24 संशयित रुग्णांनी पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग झालेल्या दोन इंटरन्स वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या तसेच दरम्यानच्या काळात रुग्णालयातून उपचार घेतलेल्या काही संशयित रुग्णांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या परिसराला पोलिसांचा वेढा असून पोलिसांची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नजर चुकवून हे संशयित रुग्ण पळाले आहेत. या रुग्णांच्या हातावर क्वारंटाईन केल्याचे छापे मारण्यात आलेले नाही. तसेच त्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी सांगितले.

हेही वाचा..

विशेष म्हणजे गुरुवारी रात्री कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गडचिंचले या गावात स्थानिक ग्रामस्थांनी तीन प्रवाशांची निर्घृण हत्या केली होती. त्या दरम्यान पोलीस या प्रकरणाच्या तपासकामात व्यस्त असल्याचा लाभ घेऊन हे संशयित रुग्ण रुग्णालयातून पसार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, इतर कर्मचारी व इतर नागरिक असे 176 संशयित रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी 24 संशयित रुग्णांनी पलायन केले आहे.

मृत्यूने ओलांडला 500चा आकडा

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1334 रुग्ण आढळले. तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 15712 तर मृतांचा आकडा 507 वर गेला आहे.

संपादन-संदीप पारोळेकर

First published: April 19, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या