बेळगावच्या मराठा लाईट इंन्फंट्रीचे 236 जवान आजपासून देशसेवेत रुजू

बेळगावच्या मराठा लाईट इंन्फंट्रीचे 236 जवान आजपासून देशसेवेत रुजू

"सहा महिन्यांहून अधिक काळ झालेल्या या जवानांच्या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग सीमेवर देश सरंक्षणासाठी होईल"

  • Share this:

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

10 एप्रिल : बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीचे 236 प्रशिक्षित जवान आजपासून देशाच्या सैन्यदलात रुजू झाले आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ झालेल्या या जवानांच्या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग सीमेवर देश सरंक्षणासाठी होईल असं मत यावेळी आर्मी वॉर कॉलेज मुहूचे कमांडर मेजर जनरल व्ही के एच पिंगळे यानी या जवानांची मानवंदना स्वीकारताना व्यक्त केलं. शपथ घेतलेल्या या जवानांची देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या भारतीय सैन्यदलात नेमणूक होणार आहे.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट ही भारतीय सैन्यदलातल्या सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. या सैन्यदलाची स्थापना 1768 साली झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. 1802 च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इन्फंट्री म्हणजे मोजक्याच सैनिकांची अत्यंत चपळपणे हालचाली करू शकणारी तुकडी. याचे प्रशिक्षण केंद्र बेळगावला आहे.

या इन्फंट्रीतल्या सैनिकाना गणपत असेही संबोधतात.अशा सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्सचे एकत्रिकरण मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये करण्यात आले. या रेजिमेंटच चिन्ह अशोकचक्र,ढाल तलवार आणि तुतारी असं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 09:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading