पवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू

पवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनिअरचा मृत्यू

अतुल हा हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खासगी रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत.

  • Share this:

अनिस शेख, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 20 एप्रिल- आपल्या पाच मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या 23 वर्षीय इंजिनिअरचा पवना धरणात बुडून मृत्यू झाला. अतुल अनिलकुमार गगन असे मृत इंजिनिअरचे नाव आहे.

अतुल हा आपल्या मित्रांसोबत पाण्यात पोहोण्यासाठी उतरला. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लोणावळा पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या साह्याने अतुल गगन याचा मृतदेह पाच वाजेच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढला.

अतुल हा हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खासगी रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत.

दरम्यान, पवना धरणामध्ये गेल्या आठवड्यात इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थांचा बुडून मृत्यू झाला होता. एम.एम सी ओई मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून ते पवना धरणात ब्राम्हणोली परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

First published: April 20, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या