पोरबंदर येथे अडकले 2250 खलाशी अखेर डहाणूत उतरले, बोट मालकावर कारवाई

पोरबंदर येथे अडकले 2250 खलाशी अखेर डहाणूत उतरले, बोट मालकावर कारवाई

गुजरात राज्यातील वेरावळ, पोरबंदर, मांगरूळ आदी भागात काम करणाऱ्या खलाशांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी 22 ते 25 बोटी महाराष्ट्र राज्याच्या सीमावर येऊन थडकल्या

  • Share this:

पालघर, 15 एप्रिल: केंद्र आणि राज्य शासनाच्या टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील तलासरी आणि डहाणू तालुक्यातील जवळपास 4 ते 5 हजारावर खलाशी गुजरात व महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या भागात अनेक बोटीमध्ये अडकून पडले होते. बोटीतून 2250 खलाशी डहाणू बंदरात उतरले. साथीच्या आजाराचा फैलाव पसरु नये यासाठी प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बोटमालक आणि खलाशी यांच्याविरुद्ध रितसर कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैद्यकिय तपासणी झाल्यनंतर सर्व खलाशींना सेंट मेरी हायस्कूल येथे थांबवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी क्वारंटाईन शिक्का मारुन त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे समजते. यावेळी त्यांना वैयक्तिक काळजी तसेच विलगीकरणाबाबत योग्य सूचनांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा..Lockdown: मराठवाड्यातल्या मदत केंद्रातून तेलंगणाचे 465 मजूर पळाले, प्रशासनाची झोप उडाली

पोरबंदर येथे अडकलेल्या डहाणू आणि तलसारीतील खलाशांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी खासदार राजेंद्र गावीत, नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी महाराष्ट्र व गुजरात प्रशासनाडे पाठपूरावा केला. डहाणूच्या किनाऱ्यावर 2000 च्या वर खलाशांना उतरवण्याचे प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू केली.

दरम्यान, गुजरात राज्यातील वेरावळ, पोरबंदर, मांगरूळ आदी भागात काम करणाऱ्या खलाशांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी 22 ते 25 बोटी महाराष्ट्र राज्याच्या सीमावर येऊन थडकल्या होत्या. या बोटी ना पालघर जिल्ह्यातील झाई येथील बंदरात उतरण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा होती. यामध्ये दोन ते अडीच हजार खलाशी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

हेही वाचा..मुंबईत कोरोनाचा आणखी एकाचा बळी, SRV हॉस्पिटलमध्ये बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू

यापूर्वी वेरावळ येथील सुमारे 800 पालघर जिल्ह्यातील खलाशांना नारंगोळ या गुजरात राज्यातील बंदरावर उतरू न दिल्याने त्या खलाशांना नाईलाजाने परतावे लागले होते. मात्र, गुजरात राज्यात देखील त्यांची खाण्या-पिण्याची परवड होत असल्याने त्यांनी आपल्या मायभूमीत येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या खलाशांना उतरून आश्रमशाळांमध्ये किंवा अन्य ठिकाणी अलगीकरण करणे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी राहणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येते. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेदेखील तलासरी तालुक्यात समन्वय साधण्यासाठी दाखल झाले आहेत.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 15, 2020, 5:55 PM IST
Tags: corona

ताज्या बातम्या