मामाच्या मुलीला का छेडतो.. जाब विचारणाऱ्या तरुणावर शस्त्राने केले 42 वार

मामाच्या मुलीला का छेडतो.. जाब विचारणाऱ्या तरुणावर शस्त्राने केले 42 वार

मामाच्या मुलीला का छेडतो, असा जाब विचारणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने तब्बल 42 वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 28 जून- मामाच्या मुलीला का छेडतो, असा जाब विचारणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने तब्बल 42 वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आकाश काकडे (वय-22) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. पुण्याच्या येरवडा परिसरात मच्छी मार्केटमध्ये गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

किरकोळ वादातून सुरू झालेल्या हाणामारीचे पर्यवसन हत्येत झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. आकाशच्या मामाच्या मुलीला घटनेतील काही आरोपी छेडत होते. याबाबत जाब विचारण्यासाठी आकाश आणि त्याचा जुळा भाऊ विकास आरोपींकडे गेले होते. आकाश आणि आरोपींमध्ये त्यावेळी बाचाबाची झाली. मात्र, रात्री हा वाद मिटवण्याच्या उद्देशाने आरोपींनी आकाशला बोलवून घेतले. आकाश येताच त्याच्यावर पाच ते सहा जणांनी हल्ला केला. मारेकऱ्यांनी आकाशवर धारदार शस्त्राने तब्बल 42 वार केले. त्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. याबाबत येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. त्यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

आरोपींना फाशीची शिक्षा द्या..

आकाशच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी आकाशचा भाऊ विकास काकडे याने केली आहे.

वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पुण्यातीस दुसऱ्या एका घटनेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पालखी बंदोबस्त लावण्यासाठी निघालेल्या लष्कर पोलीस स्टेशनचे डिओ मिलींद मकासरे यांच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. फातीमानगरला क्रोम मॉल चौकात शु्क्रवारी पहाटे 5 वाजता ही घटना घडली.

SPECIAL REPORT : नाशिकमध्ये आषाढीनिमित्त निघालेल्या सायकल वारीला लागबोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2019 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading