भावाच्या काळ्या कृत्यात बहिणीची साथ, 13 वर्षीय मुलगी राहिली गर्भवती

भावाच्या काळ्या कृत्यात बहिणीची साथ, 13 वर्षीय मुलगी राहिली गर्भवती

बल्लारपूर शहरातील टेकडी भागातील रहिवासी असलेल्या आरोपीने शेजारील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 28 मार्च : चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यातून ती गर्भवती असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाने बल्लारपूर शहरात खळबळ उडाली आहे.

पीडितेवर सध्या चंद्रपुरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी आरोपी युवक राजेश भैनवाल (वय 21) याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात भावाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी त्याच्या बहिणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - हनीमूनसाठी गेले आणि पैसे संपले; मुंबई, पुण्यासह 27 नवविवाहीत जोडपी परदेशात अडकली

बल्लारपूर शहरातील टेकडी भागातील रहिवासी असलेल्या आरोपीने शेजारील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. पण, आरोपीने पीडिता आणि तिच्या आई-वडिलांना धाक दाखवून हा गंभीर प्रकार समोर येऊ दिला नाही. याबाबतची माहिती शेजारील नागरिकांनी मिळाली.

त्यानंतर याच वॉर्डातील शेजारील नागरिकांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पण, घटनास्थळी आरोपी आणि पीडिता मुलगी किंवा तिचे आई-वडिला मिळून आले नाही.

हेही वाचा - 'कोरोनाची चाचणी करून घे', संतापलेल्या पत्नीने नवरा आणि सासूला केली मारहाण

मिळालेल्या माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी चंद्रपूर महानगर गाठून रय्यतवारी वसाहत परिसरातून आरोपींना ताब्यात घेतलं. सद्या पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

First published: March 28, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या