लग्न नाही जुळले, 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

लग्न नाही जुळले, 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

लग्न जमत नाही म्हणून वयाच्या 21 वर्षी अमोलने आत्महत्या केल्यामुळे परिसरात aहळहळ व्यक्त होत आहे.

  • Share this:

येवला, 31 मे : 'लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन..' प्रत्येक तरुण-तरुणी वयात आल्यावर लग्नाची स्वप्न पाहतो. पण, येवला तालुक्यातील अमोल जाधवचे लग्नाचे स्वप्न हे अधुरेच राहिले. लग्न जमत नसल्यामुळे 21 वर्षीय अमोलने आत्महत्या केली.

येवला तालुक्यातील अंदरसुल गावात राहणारा अमोल गणपत जाधव या 21 वर्षीय तरुण शहरात मोबाईल शॉपीचे दुकान चालवतो. स्वत:च्या पायावर उभं राहिल्यानंतर अमोल जाधवच्या कुटुंबीयांनी त्याचे दोन हात करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याच्यासाठी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला.

हेही वाचा-कोरोनाचा संसर्ग रोखणारा अनोखा ट्रॅक्टर, नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींकडून कौतुक

गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यासाठी लग्न स्थळ पाहण्याचा कार्यक्रम सुरू होता. पण, मुलींच्याकडून अनेक वेळा नकार येत होता.

बऱ्याच ठिकाणचे स्थळ बघितले. परंतु, लग्न न जमल्याने अमोल  जाधव नैराश्यग्रस्त झाला होता. त्यामुळे अमोलने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.

हेही वाचा-पोलीस ठाण्यात पोपटांना द्यावी लागली साक्ष, त्यानंतर घेतला 'हा' निर्णय

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अमोलचा मृतदेह ताब्यात घेतला. अमोलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

लग्न जमत नाही म्हणून वयाच्या 21 वर्षी अमोलने आत्महत्या केल्यामुळे परिसरात aहळहळ व्यक्त होत आहे.

संपादन -सचिन साळवे

First published: May 31, 2020, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading