21 वर्षीय गतिमंद तरुणीवर अत्याचार, पीडिता गर्भवती राहिल्याने फुटले बिंग, तरुणाला अटक

पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत मागील वर्षभरापासून गोविंदने घरात कोणी नसतानाची संधी साधून तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत मागील वर्षभरापासून गोविंदने घरात कोणी नसतानाची संधी साधून तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

  • Share this:
परळी, 22 जून: बीड (beed) जिल्ह्यातील परळी (parli) तालुक्यातील 21 वर्षीय गतिमंद तरुणीवर एका नराधम तरुणाने वर्षभरापासून सातत्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात पीडिता गर्भवती राहिल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये (Ambajogai Rural Police Station) येऊन पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची 21 वर्षीय मुलगी गतिमंद आहे. आरोपी गोविंद मुंजाजी रुद्रे (वय 21) हा औरंगाबादवरून गावात आल्यानंतर नेहमी त्यांच्या घरी येत असे. मागील वर्षापासून लॉकडाऊनमुळे त्याचे इकडे राहणे वाढले होते. पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत मागील वर्षभरापासून गोविंदने घरात कोणी नसतानाची संधी साधून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही गोष्ट आमच्या कुणाच्या लक्षात आली नाही मात्र यातून पीडिता गर्भवती राहिली आणि तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच सदर फिर्यादीवरून गोविंद रुद्रे यांच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार मोनाली पवार या करत आहेत. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी तयार केले. यात गोविंद औरंगाबादला असल्याची खबर मिळाल्यानंतर या पथकाने औरंगाबाद गाठून त्यास अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या आणि अंबाजोगाईला आणले. आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. WTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात? या घटनेनं संताप व्यक्त केला जात असून गतिमंद असल्याचा फायदा घेत आरोपीने केलेल्या दुष्कृत्यची शिक्षा पीडितेला भोगावी लागत आहेत. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा द्या, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे. महिला मुलीवरील अत्याचारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीला 24 तासात अटक केली आहे. आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.
Published by:sachin Salve
First published: