बुलडाणा, 28 मार्च: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाली आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील 21 विद्यार्थी आणि 3 शिक्षक हिमाचल प्रदेशातील चेंबा या शहरात अडकले असलायची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना अद्याप सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतातूर झाले आहेत. दुसरीकडे या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. सर्व विद्यार्थी हे शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
हेही वाचा..कोरोनाच्या लढ्यात खारीचा वाटा! चिमुलकल्यांनी साठवलेले पैसे केले दान, पाहा VIDEO
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात असलेल्या एकमेव जवाहर नवोदय विद्यालयातील नववीत शिकणाऱ्या 21 विद्यार्थी हिमाचल प्रदेशातील चेंबा येथे असलेल्या जवाहर नवोदय नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेले होते. 31 मार्च रोजी त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपणार होता. मात्र त्यापूर्वीच देशभरात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाल्याने तेथील विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा..मुंबई आणि परिसरात सर्वाधिक धोका; कोरोनाग्रस्तांच्या संख्येने केले 100 पार
मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील 21 विद्यार्थ्यांना येथील प्रशासनाने परत पाठवले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या तिथे अडकून पडले आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील राजकोट येथील 8 विद्यार्थी बुलडाणा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकत होते. विद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना राजकोट येथे सोडून दिले आहे. मात्र, सोबत गेलेले तीन शिक्षक मात्र तिथेच अडकले आहे. सध्या शिक्षक आणि विद्यार्थी सुखरूप आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांचे नातेवाईक चिंतातूर झाले आहे. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले असलायची माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कसरे यांनी दिली.
हेही वाचा..'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचं पुन्हा प्रसारण, अमोल कोल्हे यांची FB पोस्ट
दुसरीकडे, राज्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. आता पुण्यात 4 तर जळगावात एक रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. 5 नव्या रुग्णांची वाढ झाल्याने परिणामी राज्यात कॉरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 186 वर पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shegaon