अमरावती, 01 नोव्हेंबर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. अत्याचाराच्या घटनांत आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. अमरावतीत एका 20 वर्षीय तरुणीवर तिच्या ओळखीतील 25 वर्षीय तरुणाने बलात्कार (Young woman rape) केला आहे. आरोपी तरुणाने लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर अनेकदा जबरदस्तीने अत्याचार (give lure of marriage and rape) केला आहे. दरम्यान पीडितने लग्नासाठी विचारलं असता, तिची फसवणूक करत लग्नाला नकार दिला आहे.
आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित घटना अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी येथे घडली आहे.
हेही वाचा-पुण्यात शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत 3महिने विकृत कृत्य; रोज छतावर घेऊन जायचा अन्
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय आरोपी तरुण आणि 20 वर्षीय फिर्यादी तरुणी गेल्या काही काळापासून एकमेकांना ओळखत होते. दरम्यान दोघांच्या ओळखीच रुपांतर चांगल्या मैत्रीत झालं. यातूनच आरोपी तरुणाने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीनं वेळोवेळी लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत. गेल्या बऱ्यांच दिवसांपासून आरोपी पीडित तरुणीचं लैंगिक शोषण करत होता.
हेही वाचा- प्रेमात आड येणाऱ्या पतीला संपवण्यासाठी रचला खुनी खेळ; चॅटींगमधून फुटलं बिंग, माहेरचीही होती साथ
पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता, आरोपीनं लग्न करण्यासाठी नकार दिला. आरोपीचा खरा चेहरा उघड झाल्यानंतर 20 वर्षीय पीडित तरुणीने लोणी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी सध्या फरार असून लोणी पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Crime news, Rape