Home /News /maharashtra /

20 वर्षांचा नातू दारूच्या आहारी, आजीने रागावलं त्याने दगडाने वार करून संपवलं

20 वर्षांचा नातू दारूच्या आहारी, आजीने रागावलं त्याने दगडाने वार करून संपवलं

आपला नातू सारखा दारू पितं असल्यामुळे आणि काहीही काम करत नसल्यामुळे आजी रावळाबाई त्याच्यावर रागवत होत्या.

नागपूर, 03 मार्च : नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात एका नातवाने आपल्या आजीची  निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 वर्षांचा नातू हा दारूच्या आहारी गेला होता. यातूनच त्याने हे कृत्य केलं. गिट्टीखदान  पोलीस स्टेशन अंतर्गत मानवतानगर येथील लकी गणवीर वय 20 असं आरोपी नातवाचं नाव आहे. मृतक रावळाबाई गजभिये (वय 70) असं हत्या झालेल्या आजीचं नाव आहे. आरोपी लकी गणवीरला दारू पिण्याचं व्यसन जडलं होतं. हाती कोणताही काम धंदा नसल्यामुळे तो दारूच्या आणखी आहारी गेला होता. आपला नातू सारखा दारू पितं  असल्यामुळे आजी  रावळाबाई त्याच्यावर रागवत असत. सोमवारी रात्री रावळाबाई यांनी आपल्या नातवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण, यावेळी दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात लकीने दगडाने आजीवर हल्ला चढवला आणि डोक्यात दगडाने प्रहार करून आजीचा खून केला. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपीला लकीला अटक केली. आरोपी लकीने आपण आजीची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. मृत आजीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मित्रांनी केला मित्राचा खून दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगावमध्ये तरुणाचा निर्घुण खून झाल्याची  घटना उघडकीस आली आहे. मित्रांनीच आपआपसातील वादातून त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. गोकुळ दिवे असं मृत तरुणाचं नाव आहे. त्र्यंबकेश्वर जवळील सापगाव इथं  मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.   किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात गोकुळ दिवे या तरुणाचा खून झाल्याचं समजतं आहे. घटनास्थळी त्र्यंबकेश्वर पोलीस दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या