मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संतापजनक, शेजारी राहणाऱ्या 20 वर्षीय नराधमाने 5 वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार, भिवंडीतील घटना

संतापजनक, शेजारी राहणाऱ्या 20 वर्षीय नराधमाने 5 वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार, भिवंडीतील घटना

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस या नराधमांचा शोध घेत आहे.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस या नराधमांचा शोध घेत आहे.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस या नराधमांचा शोध घेत आहे.

    भिवंडी, 15 नोव्हेंबर : भिवंडी (bhiwandi) शहरात शेजार धर्माला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 20 वर्षीय नराधम तरुणाने शेजारी राहणाऱ्या एका 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील रामनगर येथील एका चाळीत ही घटना घडली.  पीडित मुलगी अंगनामध्ये खेळत होती. त्यावेळी घराशेजारीच राहणाऱ्या एका 20 वर्षीय नराधमाने या पीडित मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले. IPL 2022 : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू होणार करोडपती! वर्ल्ड कप जिंकल्याने वाढली किंमत! पीडित मुलीला अंघोळ घालत असताना हा धक्कादायक प्रकार आईच्या लक्षात आला. तीने मुलीकडे विचारपूस केली असता तिने सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने  शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधमावर बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस या नराधमांचा शोध घेत आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नोट्स देण्याच्या बहाण्यानं दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार दरम्यान,  शाळेतील प्रॅक्टिकलचे नोट्स देण्याच्या बहाण्यानं दोन अल्पवयीन मुलीना घरी बोलावून त्यांच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीला आली आहे. मुलींच्या वर्गात असलेल्या एका मुलाला पाठवून या नराधमांनी मुलींना प्रॅक्टिकलची वही देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर या मुली त्यांच्या घरी आल्या. त्यावेळी दरवाजा बंद करत दोघांनी त्यांच्यावर अत्याचार केले. Job Alert: माऊली एज्युकेशन कॅम्पस लातूर इथे 43 जागांसाठी नोकरीची संधी बिहारमधील अकबरपूर परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं आहे. मोहम्मद रियान नावाचा अल्पवयीन तरुण या तरुणींच्या घराजवळच राहत होता.  दोघीही घरात पोहोचताच बाहेरून दार लावून दोन तरुणांनी त्या दोघींवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर भांबावलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्काराचा आणि तिसऱ्या तरुणाविरुद्ध दोघांना साथ दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिघांपेकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार झाला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या