Home /News /maharashtra /

यवतमाळमध्ये नवरात्र उत्सवाला गालबोट, 2 तरुणांची निर्घृण हत्या

यवतमाळमध्ये नवरात्र उत्सवाला गालबोट, 2 तरुणांची निर्घृण हत्या

धारदार शस्त्रांनी या दोन्ही तरुणांची हत्या करण्यात आली आहे. मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही.

यवतमाळ, 12 ऑक्टोबर : देशभरात नवरात्र उत्सवाची (Navratra celebrations) धामधूम सुरू आहे. यवतमाळमध्येही (  Yavatmal) नवरात्रची धूम सुरू आहे. अशातच आर्णी मार्गावर दोन जणांची निर्घृणपणे (2 youths brutally murder) हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आर्णी मार्गावरील पल्लवी लॉन जवळ ही घटना घडली आहे. दोन तरुणांची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केला आहे.  दोन्ही तरुणाचे मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. युजर्स नाय नाय ते बोलले! न्यूड फोटोजमुळे Kylie Jenner पुन्हा एकदा ट्रोल घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धारदार शस्त्रांनी या दोन्ही तरुणांची हत्या करण्यात आली आहे. मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे. ऐन नवरात्रीच्या काळात दोन तरुणांची हत्या झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यात सॉफ्टवेअर अभियंताची हत्या तर दुसीरकडे, पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सॉफ्टवेअर अभियंता आपल्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात (Software engineer found dead) आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी मृत अभियंत्याचे दोन मित्र घरातच होते. त्यामुळे ही हत्या आहे की, आत्महत्या याबाबत गूढ निर्माण झालं आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चहूबाजूंनी पोलीस तपास करत आहेत. Shocking! म्हणे, भूत हिच्यासोबत करतो सेक्स; ऑर्गेझममुळेच मरण्याची गायिकेला भीती गणेश यशवंत तारळेकर असं मृत आढळलेल्या 47 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याचं नाव आहे. मृत गणेश तारळेकर हे कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत वास्तव्याला होते. तारळेकर हे विवाहित असून त्यांना 14 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. पण त्यांची पत्नी सध्या माहेरी राहते. दरम्यान तीन दिवसांपासून मृत गणेश तारळेकर आणि त्यांचे अन्य दोन मित्र तारळेकर यांच्या घरात पार्टी करत होते. दारू प्यायल्यानंतर तारळेकर यांनी अचानक स्वत: च्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती त्यांच्या दोन मित्रांनी दिली आहे. पण यामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यामुळे तारळेकर यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली. याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या