अलिबागच्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह सापडले

अलिबागच्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह सापडले

किल्ल्यातून परतताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने रिषभ आणि सोहराब बुडाले.

  • Share this:

अलिबाग, 16 आॅगस्ट : अलिबागच्या समुद्रात 2 पर्यटक काल पोहण्यासाठी उतरले होते,ते बेपत्ता होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

40 वर्षांचा रिषभ सिल्वा आणि 23 वर्षांचा सोहराब खान आणि त्यांचा मित्र सुरेश स्वामी हे सकाळी ओहोटी असल्याने कुलाबा किल्ल्यात गेले होते. बाकीचे दोघे समुद्रकिनाऱ्यावरच बसले होते.मोहोपाड इथून हे सगळे फिरण्यासाठी अलिबागला आले होते. किल्ल्यातून परतताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने रिषभ आणि सोहराब बुडाले.

सुरेश स्वामी कसाबसा पोहत किनाऱ्यावर पोचला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि इतर दोघांचा तपास सुरू करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading