Home /News /maharashtra /

गाढ झोपेत असताना दोन मजली इमारत कोसळली आणि...., जळगावातील घटना

गाढ झोपेत असताना दोन मजली इमारत कोसळली आणि...., जळगावातील घटना

गाढ झोपेत असताना दोन मजली इमारत कोसळली, जळगावातील घटना

गाढ झोपेत असताना दोन मजली इमारत कोसळली, जळगावातील घटना

Building collapsed in Jalgaon: जळगाव शहरात दोन मजली इमारत कोसळली.

जळगाव, 11 नोव्हेंबर : जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील (Shanipeth Jalgaon) महापालिका शाळा क्रमांक 17 जवळ असलेली जुनी दोन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली (2 storey building collapsed). पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये सुमारे 11 जण जखमी (11 injured) झाल्याची माहिती समोर येत असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचितीच येथील नागरिकांना आली. शनिपेठ भागांमध्ये इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महापालिकेची 17 क्रमांकाची शाळा शनिपेठ परिसरात आहे. त्याच्याच समोर असणारी दोन मजली जुनी इमारत पहाटे अचानक कोसळली. जोरात आवाज झाल्याने घाबरलेल्या नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. यासाठी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत बारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे. इमारत कोसळत असतांना जसा आवाज व्हायला लागला; तसे वरच्या मजल्यावरील काही नागरिक बाहेर यायचा प्रयत्न करू लागले. मात्र ज्या वेळेला इमारत कोसळली तेव्हा खालच्या मजल्यावर असणाऱ्या वृद्ध महिला मात्र तेथेच अडकून पडल्या. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि ढिगारा बाजूला करत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. दोन दिवसांपूर्वी मुंबईत घर कोसळलं 9 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईतील अँटॉप हिल (Antop Hill area ) परिसरात एक घर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 9 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या महिन्यात मुंबईत 4 मजली इमारत जमीनदोस्त ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील काळबादेवी परिसरातील एक इमारत कोसळली. मुंबईतील काळबादेवी परिसरात 3 ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली होती. अवघ्या क्षणार्धात घडलेल्या या दुर्घटनेत एका 61 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे दुर्घटनेच्या काही वेळापूर्वीच अग्निशमन दलाने ही इमारत रिकामी केली होती. त्यामुळे सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. पण याच परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका मजूर व्यक्तीचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होतं आहे. मुंबईतील कलबादेवी परिसरातील ही चार मजली इमारत जीर्ण झाली होती. या चार मजली इमारतीत जवळपास 100 कुटुंब वास्तव्याला होती. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी संबंधित इमारतीचा काही भाग कोसळला होता. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर धोका ओळखून अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतील सर्व कुटुंबाना सुरक्षित बाहेर काढलं होतं. तसेच ही इमारत रिकामी केली होती. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ही इमारत कोसळली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Jalgaon, Maharashtra

पुढील बातम्या