मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खेळण्यातील बंदूक देत चिमुकल्यांचं अपहरण; नातेवाईकांनी चोरट्या बहिणींचा डाव उधळला

खेळण्यातील बंदूक देत चिमुकल्यांचं अपहरण; नातेवाईकांनी चोरट्या बहिणींचा डाव उधळला

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी दोन बहिणींनी दोन चिमुकल्या मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी दोन बहिणींनी दोन चिमुकल्या मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी दोन बहिणींनी दोन चिमुकल्या मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Published by:  News18 Desk

परळी, 20 डिसेंबर: बीड (Beed) जिल्ह्यातील परळी याठिकाणी दोन बहिणींनी दोन चिमुकल्या मुलांना पळवून (Child kidnapping case) नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण बराच वेळ मुलं घरी न आल्याचं पाहून नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. तरीही त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. शेवटी नातेवाईकांनी रेल्वे स्थानक परिसरात शोधलं असता, येथील गल्लीत दोन्ही मुलं आढळून आले आहेत. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून आरोपी बहिणींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी असणारे लखन खंडू काळे यांचा तीन वर्षांचा मुलगा शौर्य काळे आणि भाची अनुष्का वैद्य (4) हे दोघं घरासमोर खेळत होते. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन्ही लेकरं अचानक गायब झाली. यानंतर नातेवाईकांनी आसपासचा परिसर पिंजून काढला. पण चिमुकल्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

हेही वाचा-जडीबुटीच्या उपचारासाठी विवस्त्र केलं अन्..; तरुणासोबत घडलेला प्रकार वाचून हादराल

बराच वेळ झालं तरी मुलं सापडत नाहीत, म्हणून घाबरलेल्या नातेवाईकांनी रेल्वे स्थानक परिसरात शोधाशोध केली. यावेळी रेल्वेस्थानक परिसरातील एका गल्लीत राहणाऱ्या संजना राम बिराजदार आणि तिची बहीण सपना राम बिराजदार यांच्याकडे दोन्ही मुलं आढळली. 'आमची मुलं का आणली?' असं विचारताच सपना घटनास्थळावरून पळून गेली. पण नातलगांनी पाठलाग करून तिला पकडलं.

हेही वाचा-पतीने कुऱ्हाडीने घाव घालत केलं रक्तबंबाळ; डोळ्यादेखत पत्नीनं तडफडत सोडला प्राण

तर दुसरी बहीण संजना पळून जाण्याच्या तयारीत असताना नातेवाईकांनी तिलाही पकडलं. या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी आरोपी संजना हिला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावेळी पोलिसांनी तपास केला असता. आरोपी बहिणींनी शौर्य आणि अनुष्का यांना बंदूक देण्याचं सांगून सोबत आणण्याचं कबूल केलं आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी बहिणीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news