मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed: जेवण करून घराबाहेर पडताच काळानं घातली झडप; दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

Beed: जेवण करून घराबाहेर पडताच काळानं घातली झडप; दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

(फोटो-आज तक)

(फोटो-आज तक)

Accident in Beed: बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका याठिकाणी एका भराधाव जीपने दोन सख्ख्या बहिणींना चिरडलं (2 sisters death) आहे.

  • Published by:  News18 Desk

बीड, 21 डिसेंबर: बीड (Beed) जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका याठिकाणी एका भराधाव जीपने दोन सख्ख्या बहिणींना (2 sisters death) चिरडलं आहे. संबंधित दोन्ही बहिणी रात्रीचं जेवण झाल्यानंतर आपल्या घरासमोर शतपावली करत होत्या. दरम्यान विरुद्ध दिशेनं आलेल्या जीपने दोघींना जोरदार धडक  (Terrible accident) दिली आहे. या अपघातात दोन्ही बहिणी 200 ते 300 फुटापर्यंत गाडीसोबत फरफटत गेल्या आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बहिणींना गावातील तरुणांनी तातडीने रुग्णालयात हलवलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचारासाठी जात असताना, वाटेतच दोन्ही बहिणींनी अखेरचा श्वास घेतला आहे.

रोहिणी महारुद्र गाडेकर (वय - 23 वर्षे) आणि मोहिनी महारुद्र गाडेकर (वय - 27 वर्षे) असं अपघातात मृत पावलेल्या दोन सख्ख्या बहिणींची नावं असून त्या बीड जिल्ह्यातील धनगर जवळका गावातील रहिवासी होत्या. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर साडेआठच्या सुमारास दोन्ही बहिणी घरासमोर शतपावली करत होत्या. यावेळी विरुद्ध दिशेनं आलेल्या भरधाव जीपने या दोन्ही बहिणींना चिरडलं आहे.

हेही वाचा-22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेने नाशिकमध्ये खळबळ

एवढंच नव्हे तर, या अनियंत्रित जीपने दोन्ही बहिणींना 200 ते 300 फुटापर्यंत फरफटत नेलं आहे. तसेच समोर दुचाकीजवळ उभ्या असलेल्या अन्य दोन तरुणांना देखील धडक दिली आहे. या अपघातात जखमी तरुणाच्या डोक्यात सात टाके पडले आहेत. हा तरुण वाढदिवस साजरा करून आपल्या चार मित्रांसोबत दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभा होता. याचवेळी जीप चालकाने त्यालाही धडक दिली आहे.

हेही वाचा-पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी प्रकार; महिलेला घनदाट जंगलात नेत केलं भयंकर कृत्य

हा अपघात घडताच चालकानं गाडी घटनास्थळी सोडून पळ काढला आहे. यानंतर गावातील तरुणांनी तातडीने जखमी तरुणांसह दोन्ही बहिणींना तातडीने पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण दोन्ही बहिणींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना, दोन्ही बहिणींनी वाटेतच अखेरचा श्वास घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त जीप जप्त केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

First published:

Tags: Accident, Beed