आधारवाडी जेलमधून दोन कैदी फरार

आधारवाडी जेलमधून दोन कैदी फरार

डेव्हिड मुरगेश देवेंद्रम आणि मनिकांतम नाडर अशी या दोघांची नावं असून ते चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यात कैदेत होते. सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास हे दोघं पळाल्याचं उघड झालं.

  • Share this:

कल्याण 24 जुलै: कल्याणच्या आधारवाडी जेलमधून 2 कैदी फरार झाल्याची घटना समोर आली आहे. कैदी पळाल्याची दृश्य सी.सी.टी.व्ही. कैद झाली आहेत.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून दोन कैदी पळाल्याची घटना आज सकाळी घडली. डेव्हिड मुरगेश देवेंद्रम आणि मनिकांतम नाडर अशी या दोघांची नावं असून ते चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यात कैदेत होते. सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास हे दोघं पळाल्याचं उघड झालं. जेलच्या उंच भिंतीवरुन वायरच्या मदतीने त्यांनी पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले असून पोलिसांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 09:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading