अहमदनगरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड, दलालांनी पोलिसांवरच केला हल्ला

अहमदनगरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड, दलालांनी पोलिसांवरच केला हल्ला

पांढरीपूल परिसरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मात्र, दलालांनी पोलिसांवरच हल्ला केला. यात दोन पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाले.

  • Share this:

अहमदनगर, 12 जुलै- पांढरीपूल परिसरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मात्र, दलालांनी पोलिसांवरच हल्ला केला. यात दोन पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाले. पोलिसांनी तीन दलालांसह सहा जणांना अटक केली आहे. तसेच पाच महिलांची सुटका केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरीपूल परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कसवानिया यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. यात पोलिसांनी तीन दलाल आणि तीन ग्राहकांना अटक केली. पोलीस चौकशी करत असताना दलालांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात सिद्धार्थ घुसळे हा पोलीस कर्मचारी जखमी झाला तर आरोपींनी आणि अक्षय वडते या पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्सार गफुर शेख, वाजिद नसिर शेख, मन्सूर रहमानभाई पठाण, बाबा निजाम शेख, गंगारान जानकू काळे, रशिद सरदार शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

विरारमध्ये बिअरशॉपवर आलेल्या 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

विरारमध्ये (पूर्वे) फुलपाडा रोड जनकपूर धाम येथील आयजोशी बिअर शॉपबाहेर दारू पिण्याच्या वादातून एका 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करून मारेकरी फरार झाले आहेत. केतन मंडल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, बिअर शॉपवर बिअर पिताना अमित तोमर या नावाच्या तरुणासोबत केतनची बाचाबाची झाली. त्यानंतर याचे रूपांतर हाणामारीत झाले. मारामारीत केतन याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.

फुलपाड्यातील या बिअर शॉपवर अनेकवेळा हाणामारीचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे रहिवाशी वस्तीतील हे बिअर शॉप कायमचे बंद करावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

VIDEO : धावत्या रेल्वेत चढू नका, पाहा या महिलेसोबत काय घडलं!

First published: July 12, 2019, 10:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading