सांगली, 29 सप्टेंबर: सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी असणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी घराच्या बाजूला असणाऱ्या एका विहिरीत मृतावस्थेत आढळल्या (2 Minor sisters found dead in well) आहे. ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा अशाप्रकारे हृदयद्रावक शेवट झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविता मोतीराम पवार (वय-18) आणि संगीता मोतीराम पवार (वय-14) असं मृत पावलेल्या सख्ख्या बहिणींची नावं आहेत. दोन्ही मुली मुळच्या रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील रातवड येथील रहिवासी आहेत. पण आदिवासी समाजातील या मुली आपल्या कुटुंबीयांसोबत करगणी परिसरात वास्तव्याला आहेत. दरम्यान मंगळवारी दोंघीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका विहिरीत आढळून आले आहे.
हेही वाचा-28वर्षीय तरुणीवर 4जिल्ह्यात विविध ठिकाणी बलात्कार; हातपाय बांधून दिल्या नरकयातना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी समाजातील कोळसे तयार करणारी काही कुटुंबं आटपाडी तालुक्यातील करगणी परिसरात वास्तव्याला आहेत. करगणी गावापासून काही अंतरावर असणाऱ्या वेताळ मंदिराजवळील बंधाऱ्यावरील विहिरीत या अल्पवयीन बहिणींचा मृतदेह आढळला आहे. खरंतर, मृत मुलीचं बंधाऱ्यावर नेहमी ये-जा होती. या मुली नेहमी पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आणि मासेमारी करण्यासाठी बंधाऱ्यात जात होत्या.
हेही वाचा-दुकानात गेलेल्या मुलीसोबत शेजाऱ्याचं विकृत कृत्य; भयावह अवस्थेत आढळली चिमुकली
पण मंगळवारी अचानक दोन्ही मुली विहिरीत मृतावस्थेत आढळल्या आहेत. दोन्ही मुलींचा मृत्यू पाण्यात पडल्याने बुडून झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालात समोर आली आहे. पाय घसरून मुली अपघाताने पाण्यात पडल्या असाव्यात, यातचं त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Sangli