मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संतापजनक! अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील घटना

संतापजनक! अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील घटना

 जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली

जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली

जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Palghar, India
  • Published by:  sachin Salve

राहुल पाटील, प्रतिनिधी

जव्हार, 21 सप्टेंबर : कुटुंबाचे असलेली आर्थिक परिस्थिती आणि अगतिकता याचा फायदा घेऊन जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या अल्पवयीन मुलींची नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे मनीषा 3 वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुरी करत होती. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्या या मेंढपाळाकडे मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाण अशा विविध कामांवर राबवल्या जात होत्या.

या बदल्यात त्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं आश्वासन मेंढपाळाकडून देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतला.

(मेळघाटातलं भीषण वास्तव, 5 महिन्यात 110 बालकांचा मृत्यू)

अखेर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात कलम 3(1) अंगर्गत गुन्हा दाखल झाला असून आठ वर्षीय मनीषाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. तर सहा वर्षीय काळु भोये हिचा जव्हार पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे. जव्हार मोखाडा विक्रमगड या परिसरातील अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या निरक्षरतेचा आणि येथे असलेल्या बेरोजगारीच्या समस्येचा फायदा घेत येथील चिमुकल्या मुलांची खरेदी करून त्यांना वेठबिगारी म्हणून राबवला जात असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे.

First published: