गुहागर, 05 डिसेंबर : महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळं आहेत, प्रत्येक भागातील देवस्थानांचं तिथली वेगळी प्रथा परंपरा सर्वश्रुत असते. कोकणातील गुहागर तालुक्यातील नरवण गावातली बगाडा (guhagar bagad yatra) ही प्रथा ही अशीच वेगळी आणि धडकी भरवणारी आणि संपूर्ण रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी या पाठीत दोन तीक्ष्ण हुक अडकवून जमिनीपासून साधारण 20 ते 25 फूट उंचीवरून लटकत प्रदक्षिणा मारण्याची प्रथा या गावात गेल्या अनेक वर्षांपासून अखंडीतपणे सुरू आहे. या जत्रेला गुहागरमध्ये बगाड असे संबोधले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात हेदवी या प्रसिद्ध मंदिराच्या पुढे नरवण नावाचं एक छोटस गाव आहे. या गावात वाघेश्वरी देवीचा एक कार्यक्रम केला जातो ज्याला बगाडा उत्सव असे म्हणतात. हा उत्सव देव दिवाळीच्या पूर्वसंध्येला साजरा करण्याची या गावाची परंपरा आहे.
PHOTO : पूजा सावंतचा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार, नवं फोटोशूट चर्चत!
देव दिवाळीच्या आधी गावाच्या देवीच्या मंदिरात अनेक कार्यक्रम संपन्न होतात. अनेक भक्त देवीच्या समोर आपलं गाऱ्हाणं श्रद्धेने मांडत असतात. आपली मनातील इच्छा पूर्ण झाली की, मग देवीचा नवस फेडण्यासाठी भक्तगण देव दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरवणमध्ये येत असतात. देवीच्या समोर बोललेला नवस फेडण्यासाठी इथली पद्धत ही अंगावर काटा आणणारी आहे.
ज्याचा नवस पूर्ण होतो त्याने स्वत: हून किंवा स्वतःला न जमल्यास गावातील ग्रामस्थाच्या किंवा स्थानिकांच्या माध्यमातून हा नवस फेडण्याचा असतो. नवस फेडताना पाठीत लोखंडाचे तीक्ष्ण हुक घुसवलेल्या व्यक्तीला लाटेला बांधले जाते आणि मग जमिनीपासून सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून गोल प्रदक्षिणा मारली जाते. असे केले की, देवीची कृपा आपल्यावर राहते अशी इथल्या भाविकांची धारणा आहे. त्यामुळे या गावात गेली कित्येक वर्षे ही प्रथा अखंडित सुरू आहे. नवस फेडण्याची पद्धत जरी अमानुष किंवा हृदयाचा ठोका चुकवणारी असली तरीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन या गावात हजारो भाविक बगाडा पाहण्यासाठी गर्दी करतात.
बँकेची कागदपत्र बाहेर काढली तर महागात पडेल, नवाब मलिकांचा दरेकरांना थेट इशारा
स्थानिकांच्या मते आजवर हुक टोचण्याचा कार्यक्रम करताना कुठलीही इजा अथवा टोचून घेणाऱ्या व्यक्तीला कसलाही त्रास झाल्याची घटना घडलेली नाही. नरवण गावातील एका निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे मंदिर खूप प्राचीन असून या मंदिराला कुठेही खिळा मारलेला नाही. हे या मंदिराचे वैशिष्ठ आहे. चहू बाजूनी हिरवीगर्दी झाडी आणि एकांतात वसलेलं हे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक या मंदिराला भेट देत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.