Home /News /maharashtra /

दुश्मनी मरेपर्यंत, झुंजीत गव्यांचे शिंगात शिंग अडकले अन्

दुश्मनी मरेपर्यंत, झुंजीत गव्यांचे शिंगात शिंग अडकले अन्

शिंगात शिंग अडकल्याने व शिंगे सुटू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज काढण्यात आला.

शिंगात शिंग अडकल्याने व शिंगे सुटू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज काढण्यात आला.

शिंगात शिंग अडकल्याने व शिंगे सुटू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज काढण्यात आला.

    संगमेश्वर, 10 ऑगस्ट : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील  संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील उडगिरीच्या डोंगराजवळ 2 गवा रेड्यांचा (gaur fight) मृतदेह आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे, एकमेकांशी झुंजताना शिंगात शिंग अडकून (gaur dead) दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील उडगिरीच्या डोंगराजवळ शांताराम जयगडे यांची जमीन आहे. आज सकाळी त्यांच्या जमिनीवर दोन गव्यांचा मृतदेह आढळून आले. दोन्ही गव्यांची शिंग एकमेकांमध्ये अडकलेली होती. दोघांचा मृतदेह पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. गवा रेड्यांचा शिंगात शिंग अडकल्याने व शिंगे सुटू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज काढण्यात आला. सावधान!कोरोनाच्या आडून हा आजार कधी वाढला कळालंच नाही; 5 राज्यांमध्ये जास्त रुग्ण मनोज सदानंद जायगडे हे आपली गुरे चरण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रानात जात असताना उदगिरीच्या डोंगराजवळ दोन गव्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले. मनोज जायगडे यांनी त्वरीत पोलीस पाटील प्रदीप अडबल व वनविगाला कळविले. यावेळी त्वरीत पोलीस पाटील प्रदीप अडबल सरपंच निंबाळकर, ग्रामस्थ यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली व वनविभागाला याची कल्पना दिली. यावेळी परिक्षेत्र वनविभागाचे प्रियांका लगड वनपाल, तैफिक मुल्ला, वनरक्षक नानु गावडे, मिलिंद डाफळे ,सुरेश तेली , राजाराम पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण कुणकवलेकर, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मराठा आरक्षणावर भाजपचे खासदार गप्प का बसले? केंद्राने संधी गमावली -अशोक चव्हाण पंचनामा झाल्यानंतर अथक प्रयत्नानंतर गवा रेड्याना बाजूला करण्यात आले. यावेळी पंचनामा पूर्ण करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले. शिंगात शिंग झुंजाताना बराच वेळ अडकल्याने दोघेही शेवटपर्यंत सुटू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ratnagiri

    पुढील बातम्या