Home /News /maharashtra /

BREAKING : सांगलीत भाजपचा लवकरच 'करेक्ट कार्यक्रम', 2 माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

BREAKING : सांगलीत भाजपचा लवकरच 'करेक्ट कार्यक्रम', 2 माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

 भाजपचे दोन माजी आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारी केली आहे.

भाजपचे दोन माजी आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारी केली आहे.

भाजपचे दोन माजी आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारी केली आहे.

सांगली, 25 जानेवारी : अलीकडेच झालेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने जोरदार कामगिरी केली आहे. त्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने हालचाल सुरू केली आहे. सांगलीमध्ये भाजपचे दोन माजी आमदार (bjp ex mla) राष्ट्रवादीच्या (ncp) गळाला लागले आहे. लवकरच या दोन नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांनी केला होता. तसंच नबाव मलिक यांनीही तशी शक्यता बोलूनही दाखवली आहे. अखेर जयंत पाटील यांच्या सांगलीत लवकरच भाजपचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्ह आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे दोन माजी आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारी केली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल राष्ट्रवादीने कमालीची गुप्तता बाळगली आहे. लवकरच त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील आणि शिराळयाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक या चार पैकी 2 आमदारांच्या नावाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही माजी आमदार आधी राष्ट्रवादीमध्ये होते. २०१९ च्या निवडणुकीच्या दरम्यान या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची एकाप्रकार घरवापसी होणार आहे. त्यामुळे हे दोन नेते कोण आहे, याबद्दल सांगलीमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आहे. मालेगावात काँग्रेसला खिंडार, 27 नगरसेवक राष्ट्रवादीत दरम्यान, मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठे  खिंडार पडले आहे.  निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला आहे. माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 नगरसेवक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या 27 जानेवारीला सर्वजण मुंबईतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती रशीद शेख यांनी दिली. या अगोदर माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले असून आता त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख आई महापौर ताहेरा शेख सोबत 27 नगरसेवक देखील राष्ट्रवादी प्रवेश घेत आहे. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढंच नाहीतर रशीद शेख हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. 2006 साली मालेगावात बॉम्बस्फोट झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी मालेगावला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी त्यांचे कौतुकही केले होते. पण असे असतांनाही त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या