मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांवर आभाळातून 'मृत्यू' कोसळला; भंडाऱ्यातील हृदयद्रावक घटना

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांवर आभाळातून 'मृत्यू' कोसळला; भंडाऱ्यातील हृदयद्रावक घटना

भंडारा जिल्ह्यातूनही एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.

भंडारा जिल्ह्यातूनही एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.

भंडारा जिल्ह्यातूनही एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  Kiran Pharate

नेहाल भुरे, भंडारा 17 सप्टेंबर : राज्याच्या अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचंही समोर आलं आहे. कुठे पुराच्या पाण्यात माणसे वाहिल्याच्या तर कुठे भिंत कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्यातूनही एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.

दुकानात आलेल्या वृद्ध महिलेची बॅग ब्लेडने फाडून लंपास केले दीड लाख; 2 महिलांची हातचालाखी CCTV त कैद

यात मासेमारीसाठी गेलेल्या दोघांवर वीज कोसळली. या घटनेत वीज कोसळल्यानंतर नाल्यात पडून दोघांचाही मृत्यू झाला. जिल्ह्याच्या गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर (हमेशा) येथील धरणावर ही घटना घडली आहे. दिनेश खुणे (वय 48), रा. पुलपुट्टा मध्य प्रदेश आणि बुधराम हांडके, रा. हिरापूर, तुमसर अशी मृतांची नावं आहेत.

15 दिवसांपूर्वी दिनेश आपला जावई बुधराम यांच्याकडे हिरापूर येथे घरी आले होते. सायंकाळच्या सुमारास दोघेही गावाजवळील नाल्यावरील कोल्हापुरी बंधाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी गेले. मासे पकडल्यानंतर परत येत असताना अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. यामुळे दोघेही सिमेंट बंधाऱ्याजवळील बेलाच्या झाडाखाली थांबले. मात्र त्याचवेळी अचानक वीज कोसळली.

मामाच्या पोरीवर आला जीव, पण लग्नाला नकार दिल्यावर प्रेमात वेड्या तरुणाने उचललं भयानक पाऊल

यात दोघेही जखमी होऊन नाल्याच्या पाण्यात पडले. काही अंतरापर्यंत वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना मिळताच पथकासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोघांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. अखेर दुसऱ्या दिवशी दोघांचेही मृतदेह नाल्याच्या काठावर आढळून आले आहेत. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Shocking news