मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दुर्दैवी घटना! आयुष्यभर एकाच कुटुंबात नांदल्या एकाच दिवशी झाला अंत, नावातही होतं साम्य

दुर्दैवी घटना! आयुष्यभर एकाच कुटुंबात नांदल्या एकाच दिवशी झाला अंत, नावातही होतं साम्य

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा गावात एकाच दिवशी दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाला आहे.

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा गावात एकाच दिवशी दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाला आहे.

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा गावात एकाच दिवशी दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मानोरा, 08 डिसेंबर: माणसाचा जन्म झाल्यानंतर त्याचा कधी ना कधी मृत्यू होणं ही अटळ बाब आहे. पण आयुष्यभर एकाच परिवारात नांदणाऱ्या दोन सख्ख्या जावांचा एकाच दिवशी मृत्यू येणं म्हणजे हा योगायोगच म्हणावा लागेल. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा गावात एकाच दिवशी दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही मृत जावांच्या नावात देखील साम्य असून दोघींची नावं 'शांताबाई' असं होतं.

एकाच दिवशी एकाच घरातील दोन सख्ख्या जावांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शांताबाई तुकाराम मात्रे आणि शांताबाई बाबुसा मात्रे असं मृत पावलेल्या दोन सख्ख्या जावांची नावं आहेत. दोघींचं वय 70 वर्षांपेक्षा अधिक होतं. मिळालेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शांताबाई तुकाराम मात्रे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं.

हेही वाचा-खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार; कोल्हापुरातील घटना

त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, कुटुंबीय त्यांच्या मृत्यूची बातमी आपल्या नातेवाईकांना देत होते. दरम्यान त्यांच्या मोठ्या जाऊबाई शांताबाई बाबुसा मात्रे यांची देखील सायंकाळी सहाच्या सुमारास प्राणज्योत मालवली आहे. आयुष्यभर एकाच घरात नांदलेल्या सेम नावाच्या सख्ख्या जावांचा अशाप्रकारे एकाच दिवशी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा-Pune: मैत्रिणीच्या घरी जाऊन केला बलात्कार; लग्नाचं आमिष दाखवून मिटवलं प्रकरण पण

घटनेच्या दिवशी रात्री उशिरा शांताबाई तुकाराम मात्रे यांच्यावर मानोरा येथील स्मशानभूमीत आणि शांताबाई बाबुसा मात्रे याचं कारखेडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एकाच दिवशी दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Death, Washim