नागपूर, 01 जानेवारी : नववर्षांच्या पहिल्याच दिवशी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत (pench tiger reserve project) अभयारण्यात आज कॉलरवाल्या वाघिणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहे. या वाघिणीवर विषप्रयोग करण्यात आल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे.
नवेगाव साधू शिवारात 01 जानेवारी रोजी शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात कॉलरवाल्या वाघिणीचे दोन बछडे हे मृत अवस्थेत आढळून आले आहे. या वाघिणीच्या बाजूला एक गाईचे मृत वासरूही आढळून आले आहे.
नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा; राज्यातील तुरुंगांबाबत घोषणा
या वाघिणीचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी एका शेत मालकाला अटक करण्यात आली आहे. एकाच वेळी वाघिणी आणि तिच्या बछडे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे वनविभागाचे धाबे दणाणले आहे. ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली असावी असा संशय वर्तवण्यात येत आहे.
शहरांची नावं बदलून काय साध्य होणार? बाळासाहेब थोरातांचा थेट सवाल
वनअधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास केला असता ही घटना 3 ते 4 दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वाघिणीला तीन बछडे होते. यापैकी दोन छावे हे मृतावस्थेत आढळून आले आहे. वाघिणीचा तिसरा छावा मृत झाला असेल त्याचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.