Home /News /maharashtra /

जनावरांना चारा आणायला गेले, 2 भावांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

जनावरांना चारा आणायला गेले, 2 भावांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

भोकरदन तालुक्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनावरांना बाहेर चरण्यासाठी सोडणे शक्य नव्हते.

जालना, 07 सप्टेंबर : मराठवाड्यात (marathwada rain) पावसाने धुमशान घातले आहे. जालन्यात (jalana) सर्वदूर पावसाचा जोर कायम असून एकीकडे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असताना दुसरीकडे मात्र भरपावसात विजेचा धक्का ( electric shock) लागून दोन भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन गजानन घोडे (२२) व सचिन रामकीसन घोडे (२२) अशी या दोन मयत भावंडांची नावं आहेत. लिंगेवाडीसह भोकरदन तालुक्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनावरांना बाहेर चरण्यासाठी सोडणे शक्य नव्हते. गाय वाहून गेली पण पोहत आली परत, लोकांनी घातली तोंडात बोटं LIVE VIDEO चारा घेण्याच्या उद्देशाने गेलेल्या दोघा भावांना अचानक विजेच्या धक्का लागला. शेजाऱ्यांनी आरडा-ओरडा करत त्यांची सुटका केली. त्यानंतर दोघांना तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. दोघांवरही ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर उशीरा लिंगेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे लिंगेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. बीडमध्ये चार जण गेले वाहून! तर दुसरीकडे  बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने झोडपून काढले विविध ठिकाणी नदीला आलेल्या पुरात चार वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यात दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा व तरुणाचा समावेश आहे. तालुक्यातील कपिलधार येथील नदीमध्ये दोन तरुण वाहून गेले यात ओकार विभूते या तरुणाला वाचविण्यात यश आले असून यशराज कुडकेला शोध सुरू आहे. दुसऱ्या घटनेत वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील महिलेचा पाय घसरून नदी पडली, यात तिचा बुडून मृत्यू झाला. मनिषा अशोक शेंडगे (वय 32 वर्ष) असं मयत महिलेचं नाव आहे. Corona Update: भारतात पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक लसीकरण, 24 तासांत नवा विक्रम तिसऱ्या घटनेत केज तालुक्यातील वाघे बाभुळगाव या ठिकाणी पापनाशी नदी पुलावरून पाणी वाहत इंडिका गाडी पुलावरून घालणं महागात पडलं सुदैवाने यात ड्रायव्हर वाचण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या