गोविंद वाकडे (प्रतिनिधी)
पिंपरी चिंचवड, 5 मे- दाताचे ऑपरेशन करताना पिंपरी चिंचवड परिसरात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धनश्री जाधव (वय-19) मृत तरुणीचे नाव आहे. अतिरक्तस्त्रावामुळे धनश्रीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर डॉक्टर दाम्पत्य फरार आहे.
आयुर्वेद रुग्णालय आणि स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर पाटील दाम्पत्य फरार झाले आहे. या घटनेनंतर रुग्णालय व्यवस्थापनाने दंत चिकित्सालय सील केले आहे. डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळेच धनश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पुण्यात ड्रेनेजची पाईपलाईन फुटली
येरवडा गुंजन टॉकीज चौकात पालिकेची ड्रेनेजची लाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
VIDEO: पुण्यात ड्रेनेजची पाईपलाईन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम