मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर हादरलं, 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपूर हादरलं, 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार

 पीडित तरुणीला गाण्याच्या शिकवणी वर्गाला जात असताना दोन आरोपींनी रामदासपेठ परिसरातून अपहरण केले.

पीडित तरुणीला गाण्याच्या शिकवणी वर्गाला जात असताना दोन आरोपींनी रामदासपेठ परिसरातून अपहरण केले.

पीडित तरुणीला गाण्याच्या शिकवणी वर्गाला जात असताना दोन आरोपींनी रामदासपेठ परिसरातून अपहरण केले.

नागपूर, 13 डिसेंबर : नागपूरमध्ये (nagpur) दिवसेंदिवस गुन्हेगारींच्या घटनात वाढ होत आहे. शहरातील एका 19 वर्षीय गायक तरुणीवर सामूहिक बलात्कार (gang rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण करून या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नागपूर शहरातील रामदास पेठ परिसरात ही घटना घडली आहे. पीडित 19 वर्षीय तरुणी गाण्याच्या शिकवणी वर्गाला नियमित जात होती. दोन आरोपींनी पीडित तरुणीला गाण्याच्या शिकवणी वर्गाला जात असताना रामदासपेठ परिसरातून अपहरण केले. अपहरण केल्यानंतर कळमना येथे नेऊन सामूहिक बलात्कार केला.

कोविड सेंटरच्या 15 व्या मजल्यावरून पळाला होता चोर, 7 महिन्यानंतर अखेर अटक

पीडित तरुणीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गंभीर ओळखून सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पोलीस उपअधीक्षक (गुन्हे) काही झोनचे डीसीपी दाखल आहे. पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

अकोल्यात भररस्त्यात तरुणीसमोर प्रियकराला बेदम मारहाण

दरम्यान, अकोला (Akola) जिल्ह्यातील गायगाव याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीनं 'बुरखा' परिधान केल्याच्या कारणातून एका टोळक्याने प्रियकराला बेदम मारहाण केली आहे. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जोडप्याला शिवीगाळ करत, तरुणीला भररस्त्यावर 'बुरखा' काढायला भाग पाडलं आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन विकृतांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Nagpur