मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नगरमधील शाळेला कोरोनाचा विळखा, 19 विद्यार्थी पॉझिटिव्ह

नगरमधील शाळेला कोरोनाचा विळखा, 19 विद्यार्थी पॉझिटिव्ह


अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले आहे.

अहमदनगर, 24 डिसेंबर : कोरोनाच्या भीतीमुळे चाचपडत सुरू करण्यात आलेल्या शाळा (school) आता कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar ) शाळेत 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्यापही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी सुरू असून  बधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले आहे. सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अद्यापही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी सुरू आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्हयात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आहे. श्रीरामपूर शहरात पहिला रुग्ण आढळला आहे. नायजेरिया येथून आलेल्या कुटुंबातील 41 वर्षीय महिला कोरोनाबाधित होती. या महिलेचे रिपोर्ट पुण्याला तपासणीसाठी पाठवले असता या महिलेला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर  काही जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहे.

कुत्रा Vs माकड; 250 पिल्लांच्या हत्येनंतर दोन्ही माकडांना वन विभागाने पकडलं

या महिलेची प्रकृती स्थिर असून खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक योगेश बंड यांनी दिली.

राज्यात ओमायक्रॉनचे 20 रुग्ण

दरम्यान, राज्य आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.  आज राज्यात  ओमायक्रॉन संसर्गाचे  20 रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातील 14 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर 6 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत. पुण्यात आज ६ रुग्ण आढळले आहे. यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत १ रुग्ण तर पुणे छावणी बोर्डाच्या हद्दीत ५ रुग्ण आढळून आले आहे

कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल'

तर मुंबईमध्ये एकूण ११ रुग्ण आढळले आहे.  तर सातारा  २, अहमदनगर  १ यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. या २० रुग्णांपैकी १५ जण हे आंतरराष्ट्रीय प्रवासी, तर २ आंतरदेशीय प्रवासी आणि ४ जणांना ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संपर्कातून लागण झाली आहे. यात १२ रुग्णांचे लसीकरण हे पूर्ण झाले होते. तर ७ रुग्णांचे लसीकरण झाले नाही आणि १ रुग्णाचे वय हे १८ वर्षांखालील आहे. तसंच आज राज्यात १४१० रुग्णांचे निदान झाले आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६८ रुग्ण बरे झाले आहे.

First published:

Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Corona, अहमदनगर