Home /News /maharashtra /

भिवंडीतील 19 स्मशानभूमीत भीतीदायक चित्र समोर, हँडग्लोजचा पडला खच!

भिवंडीतील 19 स्मशानभूमीत भीतीदायक चित्र समोर, हँडग्लोजचा पडला खच!

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1262 वर पोहोचला असून 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भिवंडी, 21 जून : भिवंडीत कोरोनाने थैमान घातले आहे.  शहरात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूची संख्याही वाढत आहे. तर शहरातील स्मशानभूमीत किती कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले याची माहितीच उपलब्ध नसल्याची बाबसमोर आली आहे. एवढंच नाहीतर स्मशानभूमीत हँडग्लोजचा खच पडला आहे. शहरात महानगर पालिकेची 20 स्मशानभूमी आहे. फक्त एक वगळता  सर्व   स्मशानभूमीमध्ये कोणत्याच प्रकारे सुरक्षारक्षक नसल्याने रोज किती आणि कुठले मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात  याची नोंद होत नसून  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नक्की मृत्यूचा आकडाही  समजू शकत नाही. त्यातच धक्कादायक प्रकार म्हणजे,  स्मशानभूमीत  आणि बाहेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांसाठी वापरलेल्या हॅंडग्लोजचा खच पडला आहे. एवढंच नाहीतर स्ट्रेचर सुद्धा इ फेकण्यात आलेले आहे. पत्नीने औक्षण करून मुंबईला बंदोबस्तासाठी रवाना केलं, पण परत येताच आले नाही! स्मशानभूमीच्या परिसरात आलेल्या नागरिकांनी वापरलेल्या पाण्याच्या बाटल्या तसंच मोठे घाणीचे साम्राज्य पसल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भिवंडीत 74 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू   दरम्यान, भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे 81 नवे रुग्ण आढळले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ग्रामीण भागात 36 नवे रुग्ण आढळले आहेत. शहर व ग्रामीण भागात एकूण 117 नवे रुग्ण आढळले आहेत. Shocking! स्वत:च्याच मुलामुळे गर्भवती झाली ही महिला भिवंडी शहरात आतापर्यंत 875 रुग्ण आढळले असून त्यापैकी 449 रुग्ण बरे झाले आहेत तर 66 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 361 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 387 रुग्ण आढळले असून त्यापैकी 147 रुग्ण बरे झाले आहेत तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 232 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी आढळलेल्या 117 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1262 वर पोहोचला असून त्यापैकी 595 रुग्ण बरे झाले आहेत. तर 74 रुग्णांचा मृत्यू झाला असून 593 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Bhiwandi, भिवंडी

पुढील बातम्या