Home /News /maharashtra /

Yavatmal: अनेक दिवसांपासून बेपत्ता होती तरुणी, अचानक धरणात तरंगताना आढळला मृतदेह

Yavatmal: अनेक दिवसांपासून बेपत्ता होती तरुणी, अचानक धरणात तरंगताना आढळला मृतदेह

यवतमाळमध्ये धरणात तरंगताना एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. ही तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती.

यवतमाळ, 16 जानेवारी : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. त्यातच आता यवतमाळ (Yavatmal)मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 18 वर्षीय तरुणीचा धरणात मृतदेह (18 year old girl found dead) आढळून आला आहे. मृतक तरुणी ही गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता (she was missing from some days) होती आणि आज सकाळी धरणाच्या पाण्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक तरुणीचं नाव तेजस्विनी राठोड असे आहे. तेजस्विनी ही गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. आज स्थानिक नागरिकांना तिचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाचा : भांडणानंतर पती-पत्नीने घेतलं पेटवून, 3 वर्षांच्या मुलासमोर दोघांचा तडफडून मृत्यू मृतक तरुणीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. तिच्या मृतदेहासोबत एसटी बसचा पास आढळून आला. या एसटी बसच्या पासच्या आधारे तिची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी मृतक मुलीच्या वडिलांना या संदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत. डॉक्टरांच्या हत्येचं गूढ उकललं, चौघांना बेड्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे 11 जानेवारी डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी आणि तपास केला त्यानंतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना अटक झाल्याने या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. वाचा : सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा हकनाक बळी, जन्मदातीनेच दिला भयंकर मृत्यू आरोपीचा सुगावा लागत नसल्याने आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला संशयित हा शेख एफाज शेख अब्रार याच्या सारखा शरीरयष्टीचा दिसत असल्याने पोलिसांनी आपल्या खबरीकडून माहिती काढली. असता एफाज उर्फ अप्पू शेख अब्रार याने आपले मामा आणि मित्रांच्या साहाय्याने डॉक्टरवर गोळया झाडून हत्या केल्याचं पुढे आले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Death, Yavatmal

पुढील बातम्या