मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalna: आईनेच अल्पवयीन मुलीचा लावला 3 वेळा विवाह; चौथ्या लग्नाचीही केली तयारी पण...

Jalna: आईनेच अल्पवयीन मुलीचा लावला 3 वेळा विवाह; चौथ्या लग्नाचीही केली तयारी पण...

Crime in Jalna: जालना जिल्ह्यातील भोकरदन याठिकाणी एका 17 वर्षीय मुलीचा तब्बल तीनवेळा वेगवेगळ्या तरुणांसोबत विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  News18 Desk
भोकरदन, 05 डिसेंबर: जालना जिल्ह्यातील भोकरदन याठिकाणी एका 17 वर्षीय मुलीचा तब्बल तीनवेळा वेगवेगळ्या तरुणांसोबत विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आई आणि भावांनीच मुलीचा तीनदा विवाह लावून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी पीडितेच्या चौथ्या लग्नाची देखील तयारी केली होती. पण पीडित मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत सुरू असलेला धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला आहे. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार, आई, दोन भावांसह एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, 'मला माझे आई-वडील कोण आहेत? हेच माहीत नाही. सध्या ज्यांच्याकडे राहते त्यांनीच मला लहानपणापासून सांभाळलं आहे. त्यामुळे मी त्यांना आई मानते.' पीडितेच्या या जबाबामुळे पीडितेचे खरे आई -वडील नेमके कोण? हे गूढ बनलं आहे. त्यामुळे पीडित मुलीचे खरे आई वडील शोधून काढणं पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे. हेही वाचा-3वर्षीय बहिणीसोबत भावाचं घृणास्पद कृत्य; YouTube व्हिडीओ पाहून द्यायचा नरक यातना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन शहरातील म्हाडा परिसरात एक महिला दोन मुलं आणि एका अल्पवयीन मुलीसोबत राहते. आई आणि तिच्या भावांनी पैसे घेऊन अल्पवयीन मुलीचा बालविवाह जामनेर तालुक्यातील येथील शेंदुर्णी एका तरुणाशी लावून दिला होता. पण हे लग्न केवळ एक महिना टिकलं. एक महिन्यानं मुलगी माहेरी परत आल्यानंतर, तिच्या आई आणि भावांनी पाचोरा तालुक्यातील अन्य एका तरुणासोबत तिचा दुसरा विवाह लावून दिला. हेही वाचा-गोड बोलून घरी नेलं अन्..; कोल्हापुरात जावयानं सासऱ्याचा खून करून दगडाखाली गाडलं काही दिवस येथे राहिल्यानंतर ती पून्हा भोकरदनला आली. यावेळी आरोपी आई आणि भावांनी शहरातील एका तरुणासोबत मुलीचा तिसरा विवाह लावून दिला. या तरुणासोबत पीडित मुलगी एक वर्ष औरंगाबाद येथे राहिली. पण वाद झाल्यामुळे चार महिन्यापूर्वी पीडित मुलगी पुन्हा आपल्या घरी भोकरदनला आली. यामुळे आई आणि भावांनी पुन्हा मुलीच्या चौथ्या विवाहाची तयारी केली. मात्र पीडित मुलीने भोकरदन पोलीस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Child marriage, Crime news

पुढील बातम्या