मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उस्मानाबाद उमरगा नगरपालिका क्षेत्रात अज्ञात व्यक्तीने बांधले 17 रस्ते, धक्कादायक खुलासा

उस्मानाबाद उमरगा नगरपालिका क्षेत्रात अज्ञात व्यक्तीने बांधले 17 रस्ते, धक्कादायक खुलासा

शहरात मात्र अज्ञात व्यक्तीने तब्बल 17 रस्ते बांधले आहेत. कहर म्हणजे, या रस्तायची बिलं सुद्धा नगरपालिकेने अदा केली आहेत.

शहरात मात्र अज्ञात व्यक्तीने तब्बल 17 रस्ते बांधले आहेत. कहर म्हणजे, या रस्तायची बिलं सुद्धा नगरपालिकेने अदा केली आहेत.

शहरात मात्र अज्ञात व्यक्तीने तब्बल 17 रस्ते बांधले आहेत. कहर म्हणजे, या रस्तायची बिलं सुद्धा नगरपालिकेने अदा केली आहेत.

उस्मानाबाद, 29 जून : शहरात रस्ते नसल्याची ओरड ही वारंवार होत असताना उमरगा (Umarga) शहरात मात्र अज्ञात व्यक्तीने तब्बल 17 रस्ते बांधले आहेत. कहर म्हणजे, या रस्तायची बिलं सुद्धा नगरपालिकेने अदा केली आहेत. नगरपालिकाचे मुख्यधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी तक्रारीला उत्तर देताना हा धक्कादायक खुलासा केला आहे. हा रस्ता बांधणारा अज्ञात व्यक्ती आहे तरी कोण याची शोधशोध सुरू झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगरपालिका  (osmanabad omerga municipal corporation) अनेक प्रकरणामुळे सारखी चर्चेत असते. यावेळी मात्र ती एका भन्नाट प्रकरणात चर्चेत आली आहे. 2017 साली उमरगा नगरपालिकेनं शहरात अंतर्गत रस्ते बांधले. या पैकी 17 रस्ते कोणी बांधली याचा मेळच लागेना. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर हे रस्ते अज्ञात व्यक्तीने बांधल्याचा खुलासा नगरपालिकेनं केला आहे. हे प्रकरण औरंगाबादच्या खंडपीठात गेले असता अज्ञात व्यक्ती ने रस्ते बांधल्याचे पाहून कोर्ट ही चक्रावून गेले व कडक शब्दात ताशेरे ओढत उमरगा नगरपालिकेमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे विशेष लेखापरीक्षण करा, असे आदेश दिले.

General Knowledge: स्पर्धा परीक्षांसाठी आणि नोकरीसाठी अशी करा 'GK' ची तयारी

केवळ रस्तेच नाहीत तर गेल्या साडे चार वर्षांत उमरगा नगरपालिका क्षेत्रात जवळपास 80 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे कागदावर दिसून येत आहेत. औरंगाबाद खंडपीठ विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश असून ही दोषींवर कुठलीच कारवाई होत नाही तर दुसरीकडे प्रशासन यावर तोंड उघडण्यास तयार नाहीत.

या प्रकरणाची राज्य शासनाने देखील दखल घेतली असून उमरगा नगर पालिकेच्या नगरअध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना आपणास बडतर्फ का करू नये, अशी विचारणा केली आहे तर विरोधक नगराध्यक्ष यांच्या राजनाम्याची मागणी करत आहेत.

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 'वर्षा'वर खलबतं

विहीर चोरीला गेल्याचे प्रकरण अख्या राज्याला माहीत आहे. त्याच्या वर जाऊन अज्ञात व्यक्तीने रस्ते बांधल्याचे प्रकरण कहरच म्हणावे लागेल. या प्रकरणाची चौकशी होऊन रस्ते बांधणारा अज्ञात व्यक्ती आहे तरी कोण याच शोध घ्यावा अशी मागणी उमरगावासीय करत आहेत.

First published:

Tags: Osmanabad, उस्मानाबाद